Two dead as JCB tire burst : रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर येथे जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरण्याचे काम सुरू असताना अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज बघून थरकाप उडतो. हे फूटेज व्हायरल झाले आहे. व्हिडीओत जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरत असताना टायर फुटून स्फोट झाल्याचे दिसते. स्फोटामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. दोन्ही मृत व्यक्ती मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. एकाचे नाव राजपाल सिंह आणि दुसऱ्याचे नाव प्रांजन नामदेव असे आहे.