Two groups fight over girlfriend in Ulhasnagar : उल्हासनगर : महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये गर्लफ्रेंडवरून दोन गटात हाणामारी झाली. हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हिललाईन पोलीस ठाण्यात हाणामारी करणाऱ्या दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच हाणामारीत जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे.
प्राथमिक माहितीनुसार भानू कोरी एका तरुणीच्या प्रेमात होता. पण काही दिवसांपासून संबंधित तरुणी शाकीब खान याच्या प्रेमात होती. याच मुद्यावरून भानू कोरी आणि शाकीब यांच्यात वाद झाला. दोघांनी आपापल्या मित्रांच्या मदतीने एकमेकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला आणि हाणामारी सुरू झाली. या हाणामारीत काही जण जखमी झाले.