Baba Vanga Predictions India: बाबा वेंगा... (Baba Vanga) हे नाव तुम्ही ऐकले असेलच. 2022 मध्ये त्यांचे दोन अंदाज खरे ठरले आहेत. पहिला ऑस्ट्रेलियाशी जोडलेला आहे, तर दुसरा- प्रमुख शहरांच्या दुष्काळाशी. ऑस्ट्रेलियाच्या विविध भागात पूर येऊ शकतो, अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. 'द सन'ने या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त दिले आहे. प्रचंड झालेल्या पावसामुळे ऑस्ट्रेलियातील अनेक भागात अचानक पूर आला असल्याचे समजते आहे. (two predictions of baba vanga turned out to be true said this thing for india)
याशिवाय वेंगा यांनी कोणत्याही भागाचा उल्लेख न करता मोठी शहरे दुष्काळाची शिकार होऊ शकतात असेही म्हटले होते. सध्या युरोपची स्थिती पाहिली तर हिमनद्या आणि पाण्याने वेढलेले ब्रिटन, इटली आणि पोर्तुगालसारख्या अनेक भागात दुष्काळ ओढावला आहे. यामुळे तिथल्या लोकांना पाणी वाचवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.
भारताबद्दल काय केली होती भविष्यवाणी?
वेंगा यांनी अशी भविष्यवाणी केली होती की, भारतात टोळांचा हल्ला होऊ शकतो वास्तविक, तापमानात घट झाल्यामुळे टोळांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती त्यांना व्यक्त केली होती. ते पिकांचे नुकसान करतील आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण करू शकतात.
अधिक वाचा: IKEA मध्ये गोंधळ, आरडाओरडा आणि पळापळ, नक्की काय घडलं जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर
दरम्यान, हा केवळ अंदाज असून त्यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. ही भविष्यवाणी खरी असेल की नाही याबाबत काही सांगता येणार नाही.
नव्या व्हायरसबद्दल सांगितली होती 'ही' गोष्ट
तसे, बाबा वेंगा यांचे पूर्वीचे काही भाकीतही चुकीची देखील ठरल्याचं बोललं जात आहे. त्यांनी काही गोष्टींबाबत ज्या भविष्यवाणी केल्या होत्या तसं काही बघायला मिळालं नाही. याशिवाय सायबेरियात धोकादायक व्हायरस येण्याची भविष्यवाणी त्यांनी वर्तवली होती. याला लोक बळी पडतील आणि मृत्यूच्या जबड्यात जातील अशी भविष्यवाणी वेंगा यांनी केली होती.
अधिक वाचा: revenge for biting : ओठाला सापाने दंश केला म्हणून संतापलेल्या 2 वर्षीय मुलीने सापाला चावून केले ठार
'बाल्कनचा नॉस्ट्राडेमस'
3 ऑक्टोबर 1911 रोजी उत्तर मॅसेडोनियामध्ये जन्मलेल्या वांगेलिया पंदेवा गुश्तेरोवा (Vangeliya Pandeva Gushterova) यांना जग बाबा वेंगा या नावानेच ओळखते. ते एक बल्गेरियन गूढवादी आणि वनौषधीशास्त्रज्ञ होते. त्यांना बाल्कनचा नॉस्ट्राडेमस असंही म्हटलं जायचं. असे म्हणतात की, भविष्य पाहण्याची त्यांना शक्ती प्राप्त झाली होती.
वादळ आले आणि डोळेच हिरावून घेतले!
असं म्हटलं जातं की, बाबा वेंगा हे लहानपणापासूनच अंध होते. ते 12 वर्षांचे असताना एका विचित्र चक्रीवादळात त्यांची अचाक दृष्टी गेली असे म्हटले जाते. बल्गेरियाच्या कोझुह पर्वतारांगांमधील रुपाइट प्रदेशात त्यांनी आपले बहुतेक आयुष्य व्यतीत केले. 11 ऑगस्ट 1996 रोजी सोफिया, बल्गेरिया येथे त्यांचे निधन झाले होते.