[VIDEO] एका वाघिणीसाठी दोन वाघांमध्ये खूनी संघर्ष, मग आला एक ट्विस्ट पाहून तुम्ही व्हाल हैराण 

व्हायरल झालं जी
Updated Oct 17, 2019 | 18:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tigers Fight Viral Video: राजस्थानच्या रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये दोन वाघांची लढाई सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. एका वाघिणीसाठी ही लढाई करणाऱ्या वाघसमोर आला असा ट्विस्ट पाहून तुम्ही हैराण व्हाल. 

two tigers fight for a tigress in ranthambore then what happened next watch in viral video in marathi google batmya
[VIDEO] वाघिणीसाठी दोन वाघांमध्ये खूनी संघर्ष, आला ट्विस्ट  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • दोन्ही वाघांची भीषण लढाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 
  • एक वाघिणीला मिळविण्यासाठी भिडले दोन वाघ
  • सवाई माधोपूरच्या रणथंबोर नॅशनल पार्कमधील हा व्हिडिओ 
  • अखेर तिसऱ्या वाघासोबत निघून गेली वाघिण 

नवी दिल्ली : एखाद्या महिलेसाठी दोन पुरूष लढताना तुम्ही अनेकवेला पाहिले असतील पण दोन पशूंना असे लढताना तुम्ही क्वचित पाहिले असतील. ऐकायला आश्चर्य वाढत असेल ना, पण हे खरं आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूर येथील रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये दोन वाघ एका वाघिणीसाठी आपसात लढताना पाहिले गेले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नॅशनल पार्कमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांनी स्वतःच्या डोळ्यांनी हे दृश्य पाहिले आहे आणि हैराण झाले. त्यांनी हे क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही वाघ आपल्या जवळ असलेल्या वाघिणीशी आपले कनेक्शन बनविण्यासाठी भांडत होते. पण इंटरेस्टिंग क्षण तेव्हा आला दोन्ही वाघांना लढताना सोडून ही वाघिण तिसऱ्या वाघासोबत निघून गेली. 

रणथंबोर नॅशनल पार्कच्या झोन ६ मध्ये पटवा बावडीजवळ दोन्ही वाघांमध्ये खुनी संघर्ष झाला. यात एक वाघ गंभीर जखमी झाला. 

रिपोर्टनुसार हे दोन्ही वाघ हे सख्खे भाऊ आहेत. हे दोन्ही त्या ठिकाणी राहणाऱ्या एक वाघ झुमरू वाघाटे बछडे आहेत. दोघा वाघांचे वय ९ वर्षांच्या आसपास आहे. हे दोन्ही वाघ आपसात लढत होते, त्यावेळेस ही वाघिण ज्यासाठी हे दोन्ही भाऊ एकमेकांच्या जीवावर उठले होते, ती कुंभा नावाच्या वाघासोबत निघून गेली. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओचा लोक खूप आनंद घेत आहे. पण अजूनही नॅशनल पार्कच्या प्रशासनाने या घटनेची पुष्टी केली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी