Viral Video : एक पुरुष आणि दोन बायका, सिटवरून भांडण ऐका, व्हिडीओ पाहून डोक्याला लावाल हात

व्हायरल झालं जी
Updated Apr 16, 2023 | 21:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ladies Fight Video : वाऱ्यासारखा पसरत असलेल्या या व्हीडियोमध्ये सीट वरून दोन महिला प्रवाश्यांमध्ये वाद होत असल्याचे पाहायला मिळते. पुढे हा शाब्दिक वाद विकोपाला जाऊन हातापायी वर येतो. यानंतर जे घडते ते पाहून तुम्ही देखील डोक्याला हात मारून घ्याल.

सीटसाठी भांडण
DTC बसमधील तो व्हिडीओ व्हायरल   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • दिल्लीतील DTC बसमधला हा व्हीडियो प्रचंड व्हायरल होत आहे.
  • लेडीज सिटवरून सुरू असलेला वाद विकोपाला जातो.
  • महिलांना फ्री तिकीट देण्याचा हा दुष्परिणाम असल्याचे, युजर्स नी केल्या कमेंट

Two Women Fight For a Seat in Dekhi DTC Bus : प्रवासादरम्यान अनेक वेळा सीटवरून प्रवाशांमध्ये वाद होत असतात. लांबचा प्रवास करणार्‍या प्रवाशाला पुढच्या प्रवासासाठी बसायला जागा मिळत नाही आणि त्यासाठी मग तो वाटेल ते करू लागतो, तेव्हा भांडण होण्याची शक्यता असते. सीटवरून प्रवाशांमध्ये होत असलेला वाद अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतो, ज्याचे व्हिडीओ सर्रासपणे व्हायरल होतात, आणि नेटकरी देखील असे व्हिडीओ खूप एन्जॉय करतात. असाच दिल्लीतील एका डीटीसी बसच्या प्रवासादरम्यानचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. (two women fight over a seat in delhi dtc)

अधिक वाचा : मुंबईसाठी अर्जुन ठरला लकी; जिगरबाज केकेआरवर दणदणीत विजय

वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दिल्लीच्या डीटीसी बस मधील आहे, या व्हीडियोमध्ये दोन महिलांमध्ये सीटसाठी जोरदार भांडण सुरू असल्याचे आपण पाहतो. शाब्दिक सुरू झालेली ही लढत काही वेळानंतर धक्काबुक्कीपर्यंत पोहोचते. अशावेळी बसमध्ये उपस्थित असलेले प्रवासी ते भांडण शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, परंतु भांडण कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जाते. 

पहा हा व्हीडियो - 

मुळात लेडीज सीटवरून हे भांडण सुरू होते. या व्हिडिओमध्ये दिसून येते की, लेडीज सीटवर एक पुरुष बसला आहे, त्याला एका महिलेने उठण्यास सांगितले, त्यानंतर त्याच्या शेजारी बसलेली महिला आणि उभ्या असलेल्या महिलेमध्ये भांडण सुरू होते. हे भांडण खूप वाढले, शेवटी त्या व्यक्तीला उठावे लागते आणि प्रकरण मिटते.

अधिक वाचा : दुबईत इमारतीला आग, 4 भारतीयांसह 16 जणांचा मृत्यू

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर Sumiti Chaudhary नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून तो खूप जणांनी पाहिला आहे. दोन दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 10 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. 3 मिनिटे 59 सेकंदांच्या या व्हिडिओवर आतापर्यंत 3  हजारांहून अधिक लोकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आज मी दिल्लीच्या DTC बसमध्ये दोन महिलांना भांडताना पाहिले, त्या दोन्ही सीटसाठी लढत होत्या, हा फ्री तिकिटाचा परिणाम आहे. तुम्ही व्हिडिओ बघा आणि काय चूक असेल तर सांगा!'. या व्हीडियोवर एका यूजरने लिहिले की, 'येथे लोकांना फ्री तिकीट आणि सीटही हवी आहेत.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'येथे सर्व दोष त्या पुरुषाचा आहे जो लेडीज सीटवर बसला आहे.'   
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी