नशेमध्ये उबर कॅबमध्ये झोपली महिला, जाग आली तेव्हा ड्रायव्हर करत होता रेप 

 एका महिलेने आरोप केला आहे की, पार्टीतून घरी परतत असताना एका उबर ड्रायव्हरने तिच्यावर रेप केला. महिलेच्या म्हणण्या नुसार पार्टीत दारू प्यायल्यानंतर तिने कॅब बोलावली. रस्त्यात ती झोपली, जेव्हा तिला जाग आली तेव्ह

uber driver arrested assault drunk passenger crime news in marathi
नशेमध्ये उबर कॅबमध्ये झोपली महिला, जाग आली तेव्हा ड्रायव्हर करत होता रेप   |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • महिला दारूच्या नशे होती धुत्त
  • दारूच्या नशेत कॅबमध्ये झोपली, उठल्यावर रेप करत होता ड्रायव्हर
  • महिलेच्या संमत्तीने केला सेक्स, ड्रायव्हरचा दावा

कॅलिपोर्निया :  एका महिलेने आरोप केला आहे की, पार्टीतून घरी परतत असताना एका उबर ड्रायव्हरने तिच्यावर रेप केला. महिलेच्या म्हणण्या नुसार पार्टीत दारू प्यायल्यानंतर तिने कॅब बोलावली. रस्त्यात ती झोपली, जेव्हा तिला जाग आली तेव्हा ड्रायव्हर तिच्यावर रेप करत होता. 

उबर कॅपमध्ये रेपचे हे प्रकरण अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या फोंटाना येथे समोर आले आहे. स्थानिक पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. एका महिलेने उबेर ड्रायव्हरवर बलात्काराचा आरोप लावला आहे. 

पोलिसांनी सांगितले की मित्रांसोबत रात्री पार्टी केल्यानंतर महिला घरी परतत होती. पोलिसांनी सांगितले की, उबेर ड्रायव्हरने महिलेसोबत संबंध बनविण्याचे कबूल केले होते. पण हे संबंध तिच्या सहमतीने बनवले होते. 

रविवारी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनुसार महिला शनिवारी रात्री पार्टी केल्यानंतर तीने घरी जाण्यासाठी कॅब मागवली होती. पोलिसांनी संशयीत उबेर ड्रायव्हरची ओळख पटवली असून त्याचे नाव अलोन्सो कॅले आहे. त्याने स्वतःहून पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर अलोन्सोने सांगितले की, सहमतीने संबंध बनविण्यात आले, पण त्याला भीती होती की, महिला रेपचा आरोप केला जाऊ शकतो. 

महिलेशी सहमतीने संबंध बनविल्याचे ड्रायव्हरने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याने सांगितले की, फोंटना येथील मॅकडेरमॉक पार्कमध्ये त्या महिलेशी शरीर संबंध बनविले होते. पण ड्रायव्हरच्या या दाव्यानंतरही महिला आपल्यावर रेप झाल्याचे ठामपणे सांगत आहे. ड्रायव्हरने या गोष्टीची कबुलीही दिली की मला माहिती होते की महिला नशेच्या अमंलाखाली होती. 

पोलिसांनी ड्रायव्हर वर रेप प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ड्रायव्हरला अटक केली असून त्याला कोर्टात सादर करण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी