Viral News | कॅब ड्रायव्हर मुलीला म्हणाला...मी उबर South Asia President आहे, मुलीने गुगलवर चेक केले आणि मग...

Prabhjeet Singh : लोक बर्‍याचदा कॅब बुक करतात आणि ऑफिस किंवा इतर ठिकाणी जातात, पण त्यांचा प्रवासाचा अनुभव कधी चांगला असतो तर कधी कटू असतो. एक अतिशय मजेशीर प्रकरण समोर आले आहे. एक मुलगी उबेर कॅब (Uber Cab)बुक करून जात होती. कॅबमध्ये जेव्हा तिला ड्रायव्हरबद्दल माहिती मिळाली तेव्हा ती प्रथम आश्चर्यचकित झाली. त्यानंतर तिने ड्रायव्हरसोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली. हा ड्रायव्हर दुसरा कोणी नसून उबर इंडिया आणि उबर दक्षिण आशियाचा सीईओ (Uber India & Uber South Asia President ) होता.

Viral news of Uber CEO
उबर इंडियाच्या सीईओची व्हायरल बातमी 
थोडं पण कामाचं
  • एका कॅबसंदर्भात एक मजेशीर प्रकरण समोर आले आहे
  • एक मुलगी उबेरच्या कॅबने प्रवास करत असताना तिला ड्रायव्हर थक्क केले
  • कारण हा ड्रायव्हर दुसरा कोणी नसून उबर इंडिया आणि उबर South Asia President होता.

Uber  South Asia President ​Prabhjeet Singh : नवी दिल्ली  : लोक बर्‍याचदा कॅब बुक करतात आणि ऑफिस किंवा इतर ठिकाणी जातात, पण त्यांचा प्रवासाचा अनुभव कधी चांगला असतो तर कधी कटू असतो. एक अतिशय मजेशीर प्रकरण समोर आले आहे. एक मुलगी उबेर कॅब (Uber Cab)बुक करून जात होती. कॅबमध्ये जेव्हा तिला ड्रायव्हरबद्दल माहिती मिळाली तेव्हा ती प्रथम आश्चर्यचकित झाली. त्यानंतर तिने ड्रायव्हरसोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली. हा ड्रायव्हर दुसरा कोणी नसून उबर इंडिया आणि उबर  South Asia President  (Uber India & Uber  South Asia President ) होता. यानंतर मुलगी खूप खूश झाली आणि तिने ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर ही बातमी खूपच व्हायरल (Viral News) झाली आहे.  (Uber India CEO Prabhjeet Singh become cab driver for consumers)

 South Asia President असून बनले ड्रायव्हर

वास्तविक, प्रभजीत सिंग हे सध्या उबर इंडिया आणि उबर दक्षिण आशियाचे प्रमुख (Uber India & Uber  South Asia President Prabhjeet Singh)आहेत आणि ते स्वत: ड्रायव्हर म्हणून रस्त्यावर उतरले होते. दिल्ली आणि गुरुग्राममधील दोन मुलींनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर प्रभजीत सिंगसोबत सेल्फी पोस्ट करून ही गोष्ट सांगितली आहे. लिंक्डइनवर प्रभजीत सिंगसोबतचा सेल्फी पोस्ट करत अनन्या द्विवेदी यांनी याबाबत सांगितले, ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघून कॅब बुक केली.

ड्रायव्हर करून दिली ओळख

कॅबमध्ये बसल्यावर थोड्या वेळाने ड्रायव्हरने स्वतःची ओळख करून दिली. ड्रायव्हरने आपण उबर इंडिया आणि उबर South Asia President  असल्याची ओळख दिली. यावर अनन्याने गुगल केले आणि ड्रायव्हर खरोखरच प्रभजीत सिंग असल्याचे निष्पन्न झाले. असाच प्रकार आणखी एका मुलीसोबत घडला आहे. मधुवंती नावाच्या युज सोशल मीडियावर लिहिले की, उबर ड्रायव्हरकडून ड्रॉप लोकेशन न कळता ऑन-द-वे मेसेज मिळणे खूप प्रभावी होते. नंतर उबेर  South Asia President ला भेटणे हा माझ्यासाठी अनोखा दिवस ठरला.

प्रभजीत सिंग बनतात ड्रायव्हर

समोर आलेल्या माहितीनुसार प्रभजीत सिंग इतर अनेक प्रवाशांसाठी ड्रायव्हर बनले. या घटना उघडकीस येताच लोकांनी प्रभजीत सिंग यांच्या साधेपणाबद्दल त्यांचे कौतुक करण्यास सुरुवात केली. कुणीतरी लिहिलंय की हे वाचून आजचा दिवस खरोखरच एक दिवस बनला आहे. एका व्यक्तीने या मुलींना खूप भाग्यवान म्हटले आणि म्हटले आहे की, अशा व्यक्तीला भेटणे खूप छान झाले असते. सध्या सोशल मीडियावर प्रभजीत सिंगचे खूप कौतुक होत आहे.

आपल्या प्रवाशांबद्दल जाणून घेण्यासाठी, ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या कंपनीच्या सेवेबद्दलचा ्ग्राहकांचा अनुभव जाणून घेण्यासाठी प्रभजीत सिंग स्वत:च ड्रायव्हर बनून उबरची कॅब चालवतात. यामुळे त्यांना थेट ग्राहकांशीच संवाद साधण्याची संधी मिळते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी