मधुचंद्राच्या रात्री तिने नकार दिला, कारण कळताच पतीच्या पायाखालची जमीनच सरकली

suhaagraat story : प्रत्येक जोडपे लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची वाट पाहत असतात. नवविवाहित वधू-वर आपापल्या परीने ते संस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करतात, पण जागीच त्यांची फसवणूक झाली तर काय म्हणाल.

unheard story of honeymoon night In marathi
मधुचंद्राच्या रात्री तिने नकार दिला, कारण कळताच पतीच्या पायाखालची जमीनच सरकली  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लग्नानंतर नववधूने पतीला हात लावून दिला नाही
  • सांगितले कारण सांगून टाळाटाळ
  • सात दिवसांनी वधू दागिने आणि पैसे घेऊन फरार

wedding night story : प्रत्येक तरुण-तरुणीसाठी लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्रीची वाट पाहत असतात. तो क्षण अविस्मरणीय करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न होत असतो. पण काही कारणांमुळे त्या दिवशी व्यत्यय आल्यास हिरमोड होत असतो. अशीच एक घटना इंदूरमध्ये काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ज्यामध्ये नववधूने मूड नसल्याचे कारण सांगितले. पण काही दिवसांनंतर सत्यसमोर आल्यानंतर पतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

अधिक वाचा : राहुल गांधींना दोन वर्षांचा तुरुंगवास

मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणाचा पूर्वनिश्चित तारखेला रीतिरिवाजांसह विवाह सोहळा पार पडला. मधुचंद्राच्या रात्री वर आपल्या वधूसह नवीन जीवन सुरू करण्यासाठी उत्सुक होता. नवविवाहित वधूने वराला सांगितले की तिला मासिक पाळी सुरू झाली आहे, त्यामुळे ती शारीरिक संबंध ठेवू शकत नाही. लग्नाच्या 7 दिवसानंतर वधू बेपत्ता झाली. 

अधिक वाचा : राम नवमीला बनतोय विशेष योग, 'या' राशींना होणार मोठा लाभ

वधू अचानक बेपत्ता झाल्यानंतर वर आणि त्याच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. घरात पाहिले ती सोन्याचे मंगळसूत्र, टॉप्स तसेच चांदीचे दागिने आणि 3 लाख रुपये रोख घेऊन फरार झाली. यानंतर संतप्त झालेल्या वर पक्षांनी थेट लग्न ठरविणाऱ्या एजंटचे घर गाठले. तेथे नववधू दलालासोबत त्याच खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली. यामुळे वराच्या आणि कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. नंतर समजले की ती एजंटची बायको आहे. या सर्वांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. यामागे मोठी टोळी असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी