Indian Railway: देशातील 'निनावी' रेल्वे स्टेशन... प्रवाशांचा उडतो गोंधळ

व्हायरल झालं जी
Updated Mar 19, 2023 | 09:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

अनेकवेळा नवीन लोकांना आणि प्रवशांना रेल्वेने प्रवास करताना अशा समस्यांना सामोरे जावे लागते. कधी कधी अनेक प्रवाशांचे स्टेशन देखील चुकते कारण या स्टेशनला नाव नसल्यामुळे प्रवासी गोंधळून जातात. आपण म्हणतो नावात काय आहे, पण नावच नसेल तर असा गोंधळ उडतो त्यामुळे माणसाला असो वा स्टेशनला नाव हवचं.

Unique railway station in west Bengal
देशातील 'निनावी' रेल्वे स्टेशन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतीय रेल्वेचे मोठे नेटवर्क
  • रेल्वे स्टेशनला कुठेच नाव दिसणार नाही
  • हे रेल्वे स्टेशन कुठे आहे?

Interesting Railway Facts:भारतातील लोकं सहसा लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी ट्रेनचा वापर करतात. कारण रेल्वे प्रवास हा सर्वात किफायतशीर, फायदेशीर आणि सुरक्षित मार्ग मानला जातो. भारतीय रेल्वेने देशभर मोठे नेटवर्क तयार केले आहे. भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा रेल्वे नेटवर्क तयार करणारा देश बनला आहे. आजही भारतामध्ये अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत जी अनेकांना माहित नाही आणि त्याचे खास वैशिष्ट्य आहे.

 पिवळी रिकामी पाटी

आज आम्ही तुम्हाला अशा एका अनोख्या रेल्वे स्टेशनबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसेल. सर्व रेल्वे प्रवासी कोणत्याही स्टेशनला नावावरून ओळखतात आणि तिच सर्वात मोठी उपयुक्त माहिती असते, परंतु ज्या रेल्वे स्थानकाबद्दल आण्ही सांगणार आहोत त्याला नाव नाही. या रेल्वे स्टेशनला तुम्हाला कुठेच नाव दिसणार नाही. येथे तुम्हाला फक्त पिवळी रिकामी पाटी बघायला मिळेल.

अधिक वाचा: Indian Railway: एक्सप्रेसच्या नावाखाली बैलगाडी आहे 'ही' ट्रेन, 111 ठिकाणी थांबे आणि अडीच दिवसांचा प्रवास

हे रेल्वे स्टेशन कुठे आहे?
हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील एका शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. या रेल्वे स्टेशन जवळच रैना हे एक छोटं गाव आहे जिथे 2008 मध्ये नवीन रेल्वे स्थानक बांधण्यात आले, परंतु येथील स्थानिक वादामुळे या स्टेशनचे नाव ठरू शकले नाही आणि आजतागायत हे रेल्वे स्थानक अज्ञात आहे. येथील स्थानिक वादामुळे या स्थानकाचे नाव ठरवता आले नाही.  रैना आणि रैनागड ही दोन गावं आहेत आणि या गावाच्या नावावरूनच येथे हा स्टेशनच्या नावाचा वाद सुरू आहेत. या गावांतील लोकांमध्ये अनेक दिवसांपासून मतभेद आहेत. रैनागढ गावात पूर्वीपासूनच रैनागढ रेल्वे स्थानक होते, त्यामुळे या स्थानकाला रैनागढ स्टेशन असे नाव देण्यात यावे असे येथिल स्थानिकांचे मत आहे.

अधिक वाचा: Mumbai Viral Video:डोंबिवली रेल्वे स्थानकावर कपलचा खुल्लम खुल्ला प्यार; जोडप्याचा Kissing व्हिडिओ व्हायरल 

प्रवाशांना अडचणी

हे स्थानक ज्या रेल्वे मार्गावर आहे त्याला बांकुरा-दामोदर रेल्वे मार्ग (Bankura-Damodar Railway Route) म्हणतात. बांकुरा-मसग्राम गाडी या स्थानकावर सहा वेळा थांबते. एखादा प्रवासी इथे पहिल्यांदा आला तर त्याला कुठए जावे हे कळणार नाही, कारण या स्टेशनला नावच नाही! त्यामुळे अनेकवेळा नवीन लोकांना आणि प्रवशांना रेल्वेने प्रवास करताना अशा समस्यांना सामोरे जावे लागते. कधी कधी अनेक प्रवाशांचे स्टेशन देखील चुकते कारण या स्टेशनला नाव नसल्यामुळे प्रवासी गोंधळून जातात. आपण म्हणतो नावात काय आहे, पण नावच नसेल तर असा गोंधळ उडतो त्यामुळे माणसाला असो वा स्टेशनला नाव हवचं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी