अजब लग्नाची गजब गोष्ट! दोन बायकांनी नवऱ्याला 3-3 दिवस घेतलं वाटून आणि सातव्या दिवशी...

husband&wives unique distribution व्यक्तीने आपल्या सहकाऱ्याशी दुसरे लग्न केले. दरम्यान, तो ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या पहिल्या पत्नीला घेण्यासाठी न आल्याने महिलेला संशय आला आणि तिने एके दिवशी पतीचे गुरुग्राम कार्यालय गाठले.

Unique settlement in 'one husband-two wives' case:
अजब लग्नाची गजब गोष्ट! दोन बायकांनी नवऱ्याला 3-3 दिवस घेतलं वाटून आणि सातव्या दिवशी...   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ग्वाल्हेरमध्ये इंजिनिअरने पहिली पत्नी असताना दुसरीशी लग्न
  • प्रकरणात कुटुब न्यायालयात पोहोचले
  • दोन्ही महिलांनी करार केला

viral news : संपत्तीच्या वाटपानंतर आता एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात एक पुरुष दोन महिलांसोबत आठवड्यातून तीन दिवस परस्पर संमतीने राहतील आणि रविवारी त्याला ज्या महिलेसोबत राहायचे आहे, तिच्यासोबत राहू शकेल. हे प्रकरण मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरशी संबंधित असून, कौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण समोर आले. (Unique settlement in 'one husband-two wives' case:)

अधिक वाचा : गुरुग्राममध्ये पैशांचा पाऊस! धावत्या कारमधून शाहिद कपूर स्टाईलमध्ये उधळले लाखो रुपये, पहा नेमकं काय घडलं?

या प्रकरणात ग्वाल्हेरमधील एका मुलीचे लग्न 2018 साली गुरुग्राममध्ये काम करणाऱ्या इंजिनिअरशी झाले होते आणि दोघेही दोन वर्षे एकत्र राहत होते. कोरोना महामारीच्या काळात अभियंता आपल्या पत्नीला ग्वाल्हेर येथे तिच्या माहेरच्या घरी सोडले. दरम्यान, गुरुग्राममध्ये त्याने 2020 मध्ये त्याच्यासोबत काम करणाऱ्या दुसऱ्या मुलीसोबत पुन्हा लग्न केले आणि त्यांना एक मुलगीही झाली. दरम्यान, जेव्हा तो ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या पहिल्या पत्नीला घेण्यासाठी आला नाही तेव्हा तिला थोडासा संशय आला.

अधिक वाचा : Viral Video : महाकाय अजगर नट-बोल्ट सारखं गोल करत चढला झाडावर , व्हिडिओ पाहून थक्क व्हाल 

एके दिवशी पहिल्या पत्नी गुरुग्राममध्ये पतीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तेथे तिच्या पतीने दुसरे लग्न केल्याचे कळले. यावरून बराच वाद झाला आणि अखेर महिलेने ग्वाल्हेरच्या कौटुंबिक न्यायालयात देखभालीसाठी खटला दाखल केला. शेवटी दोन्ही महिलांनी पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. करारात पतीने एका पत्नीसोबत तीन दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबत तीन दिवस राहण्याचा निर्णय घेतला. आठवड्याच्या शेवटी म्हणजेच रविवारी, त्याला कोणाच्या सोबत राहायचे आहे याची निवड त्याने करायची आहे. 'या करारानंतर पहिली पत्नी गुरुग्रामला गेली आहे. तेथे त्याने दोन्ही पत्नींना स्वतंत्र फ्लॅट दिले आहेत आणि आपल्या पगारातील निम्मा रक्कमही देण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी