मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे सुनेबाबत खुलासा झाल्यानंतर सासरकडच्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सून तृतीयपंथीय निघाल्याने धक्का बसला आहे. बातमीनुसार 28 ऑक्टोबर रोजी सहारनपूर येथील एका तरूणाने लग्न केले होते. कोणत्याही अडचणीविना विवाह संपन्न झाला. नवीन वधू घरी आल्यामुळे हे कुटुंब खूप आनंदात होते. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की वधू पाच महिन्यांपासून तिच्या पतीजवळ आली नव्हती (Not Ready To celebrating Marriage First Night). ती रोज एक नविन बहाणा करायची. तिच्या पतीने तिच्यावर संशय येताच त्याने मुलीचे वैद्यकीय तपासणी केली. हा अहवाल येताच कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली.
वैद्यकीय अहवालानुसार वधू किन्नर (Kinnar In Medical Report) म्हणजे तृतीयपंथीय असल्याचे उघड झाले. मुलाच्या कुटुंबास समजताच त्यांचा सर्व आनंद एका क्षणातच नाहीसा झाला. त्याचवेळी मुलाच्या परिवाराने वधूच्या कुटुंबावर मुलींशी फसवणूक करुन विवाह केल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी पीडित वधूने तिच्या सासरच्यांनी तिला ओलिस ठेवले असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत वधू आणि तिच्या सासू-सासऱ्यांना ताबडतोब पोलिस ठाण्यात नेले.
वरच्या आणि वधुच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यातच आरडाओरडा केला, तर मुलाच्या कुटूंबाने वधू घरात ठेवण्यास नकार दिला. मुलाच्या कुटुंबियांनी मुलीच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रे पोलिसांना दाखविली. बऱ्याच गोंधळानंतर वधू आपल्या मामाबरोबर निघून गेली. इंस्पेक्टर एचएन सिंह यांचे म्हणणे आहे की मुलाच्या आणि मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलविण्यात आले होते. मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणात, अद्यापपर्यंत कोणतीही लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
या मुलाच्या कुटुंबाचा आरोप आहे की, मुलीच्या कुटूंबाने अंधारात ठेवून किन्नरशी मुलाचे लग्न लावून दिले आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की लग्नानंतर ५ महिन्यांपर्यंत मुलीने आपल्या पतीला जवळ येऊ दिले नाही. त्याचवेळी मुलीने जबरदस्तीच्या आरोपाखाली पतीला बेड्या ठोकेल अशी धमकीही दिल्याचा आरोप मुलाच्या परिवाराने केला आहे. ही मुलगी पतीविरूद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही देत होती. मुलाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की ती शांतपणे घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करीत होती, जेव्हा तिला रोखण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा उलट तिने सासरच्यांनी त्यांना ओलीस ठेवल्याचा आरोप केला आणि पोलिसांना बोलावले.