‘या’ रेस्टॉरंटमध्ये मिळणार मोफत पिझ्झा, फक्त त्यासाठी करावं लागेल ‘हे’ काम

व्हायरल झालं जी
Updated Jun 12, 2019 | 16:07 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील एका रेस्टॉरंटमध्ये लोकांना मोफत पिझ्झा मिळतोय. मात्र यासाठी ४ जणांच्या एका ग्रुपला पिझ्झा खाताना फक्त एक गोष्ट करायचीय. ती केली तर तुम्ही मोफत पिझ्झा खाऊ शकाल, जाणून घ्या ऑफरबद्दल.

Pizza
मोफत पिझ्झा खायचाय, ही ऑफर वाचा  |  फोटो सौजन्य: Representative Image

नवी दिल्ली: आजकाल प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन दिसतो. फोन आपल्या रोजच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलाय. कुणाचाही दिवस फोनशिवाय जात नाही. पर्सपासून तर पुस्तकापर्यंत आणि बँकेच्या कामापासून तर औषधं मागवण्यापर्यंत सर्व कामं फोनद्वारे केली जात आहेत. त्यामुळे फोनमध्ये प्रत्येक जण व्यस्त असतो. जेव्हापासून प्रत्येकाच्या हातात फोन आलाय तेव्हापासून एकमेकांसोबत प्रत्यक्ष बोलणं कमी झालंय. लोकांच्या हातातील फोन बाजूला सारून त्यांना प्रत्यक्षात बोलतं करण्यासाठी कॅलिफोर्निया इथल्या एका रेस्टॉरंटनं एक चांगली आयडिया केलीय.

या रेस्टॉरंटनं आपल्या इथं येणाऱ्या ग्राहकांना मोफत पिझ्झा खाऊ घालण्याची ऑफर दिलीय. मात्र यासाठी आपल्याला फक्त आपला फोन बंद करून आपल्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबियांसोबत गप्पा माराव्या लागतील. पिझ्झा कंपनी फ्रेस्कोनं आपल्या ग्राहकांसाठी ‘टॉक टू इच अदर डिस्काऊंट’ नावानं एक ऑफर दिलीय. जे लोक त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये खायला येतील. तेव्हा त्यांनी आपला फोन बंद करून चार जणांसोबत गप्पा मारायच्या. जर लोकांनी हे केलं तर त्यांना पिझ्झा मोफत दिला जाईल. कंपनी ही ऑफर तेव्हाच देईल, जेव्हा कमीतकमी ४ जणांचा ग्रुप रेस्टॉरंटमध्ये येईल.

या चार जणांना रेस्टॉरंटमध्ये जेवताना आपला फोन लॉकरमध्ये बंद करून ठेवावा लागेल आणि जर त्यांनी असं केलं तर त्यांना मोफत पिझ्झा मिळेल. जर ग्राहकाला मोफत मिळालेला पिझ्झा घरी घेऊन जायचा नसेल तर ते दुसऱ्यांदा रेस्टॉरंटमध्ये येतील, तेव्हा तो खाऊ शकता. रेस्टॉरंट आपल्या या ऑफरचं प्रमोशन करण्यासाठी फेसबुकचा सुद्धा वापर करत आहे.

फेसबुकवर आपल्या ऑफरची जाहिरात करताना रेस्टॉरंटनं लिहिलंय, ‘आमचं लक्ष्य कुटुंब/मित्र यांच्यातील मोबाईलचा वापर कमी होऊन प्रत्यक्ष संवाद साधणं हे आहे.’ जर आपल्याला एक मोठा पिझ्झा मोफत हवा असेल तर (प्रति ग्रुप) पुढील दौऱ्यात तुम्हाला तो मिळू शकेल किंवा आपण कुठल्याही गरजवंताला हा पिझ्झा दान पण करू शकता. आम्ही प्रत्येक महिन्याला फ्रेस्कोद्वारे गरीबांना मोफत पिझ्झा वाटप करत असतो. यासाठी जर तुम्हाला मोफत मिळालेला पिझ्झा खायचा नसेल तर तो तुम्ही दान करू शकता.

या ऑफरचा लाभ मिळविण्यासाठी एका ग्रुपमध्ये कमीतकमी ४ लोक असणं आवश्यक आहे आणि प्रत्येकाजवळ स्मार्टफोन असणंही गरजेचं आहे. कॅशिअर नेटवर्कसाठी सर्व फोनचं निरीक्षण करेल आणि फोन लॉकरमध्ये ठेवेल.

रेस्टॉरंटचे मालक असलेल्या वरिंदर मल्ही यांनी फॉक्स न्यूजसोबत बोलताना सांगितलं की, ते स्वत:च्या फोनच्या वापरावरून या ऑफरसाठी प्रेरित झाले. आपल्या मुलांसमोर एक चांगलं उदाहरण स्थापन करण्यासाठी मल्हीनं आपल्या घरी फोनचा वापर करणं बंद केलाय. जोपर्यंत त्याची गरज नसेल. जेव्हा त्याचा त्यांना फायदा झाला, तेव्हा त्यांनी रेस्टॉरंटमध्येही ही कल्पना वापरण्याचं ठरवलं. मल्ही यांनी आतापर्यंत या योजनेअंतर्गत ४०-५० पिझ्झा मोफत दिले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी