Surrogacy : महिलेने आपल्याच नातीला दिला जन्म, महिला आपल्याच मुलाच्या मुलीची झाली आई

Surrogacy USA : सरोगसीचे अनेक घटना तुम्ही ऐकल्या असती. ज्यामध्ये एका महिलेने एका दाम्पत्याच्या बाळाला जन्म दिला असेल. परंतु अमेरिकेत एक सरोगसीची विचित्र घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्याच मुलाच्या बाळाला सरोगसीतून जन्म दिला आहे. सोशल मीडियावर सरोगसीच्या घटनेवर चर्चा सुरू आहे.

usa surrogacy
अमेरिका सरोगसी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सरोगसीचे अनेक घटना तुम्ही ऐकल्या असती. ज्यामध्ये एका महिलेने एका दाम्पत्याच्या बाळाला जन्म दिला असेल.
  • परंतु अमेरिकेत एक सरोगसीची विचित्र घटना समोर आली आहे.
  • एका महिलेने आपल्याच मुलाच्या बाळाला सरोगसीतून जन्म दिला आहे.

Surrogacy USA : वॉशिंग्टन डी.सी. : सरोगसीचे अनेक घटना तुम्ही ऐकल्या असती. ज्यामध्ये एका महिलेने एका दाम्पत्याच्या बाळाला जन्म दिला असेल. परंतु अमेरिकेत एक सरोगसीची विचित्र घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्याच मुलाच्या बाळाला सरोगसीतून जन्म दिला आहे. सोशल मीडियावर सरोगसीच्या घटनेवर चर्चा सुरू आहे. अमेरिकेत एका दाम्पत्याला मूल होऊ शकत नव्हते. अशा वेळी तरुणाच्या आईने आपल्या मुलाच्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे. (usa 56 year old women give birth of own son by surrogacy)

अधिक वाचा : Math Teacher Dance Video: बाईंचा डान्स पाहून गुरुजींना घालता येईना आवर, ठुमके पाहून फुटेल हसू

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या उटाह भागार राहणार्‍या जेफ हॉकची पत्नी कँब्रियाची एक सर्जरी पार पाडली होती. या सर्जरीत कँब्रियाचे गर्भाशय काढावे लागले होते. त्यामुळे कँब्रिया आई होऊ शकत नव्हती. या दाम्पत्याने सरोगसीचा पर्याय निवडला. तेव्हा सरोगसीसाठी जेफ हॉकची आई नॅन्सी हॉक पुढे आल्या. नॅन्सी या ५६ वर्षाच्या आहेत. त्यांनी सरोगसीसाठी एक पाऊल पुढे टाकले. नॅन्सी यांनी एका मुलीला जन्म दिला असून ती सुदृढ आहे. नॅन्सी उटाह येथील एका विद्यापीठात कार्यरत आहेत. आपल्या मुलाच्या बाळाला जन्म दिल्यानंतर खूप आनंदी आहेत. परंतु हे बाळ आपल्या सुनेकडे सोपववे लागणार आणि ते आपल्यासोबत राहणार नाही याची खंत नॅन्सी यांना आहे. 

अधिक वाचा : Chip implanted in hand: सारखं सारखं खिशातून ATM Card काढण्याचा कंटाळा, हातातच बसवली चिप

अमेरिकेत अशाच प्रकारे काही महिन्यांपूर्वी ४९ वर्षीय महिलेने एका आपल्याच मुलीच्या बाळाला जन्म दिला होता. या महिलेच्या मुलीला बाळ होत नव्हते. अशा वेळी ही महिला पुढे आली आणि आपल्या मुलीच्या बाळाला जन्म देऊन आपल्या मुलीला आई केले. 


 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Cambria Hauck (@cambriairene)
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी