गर्लफ्रेंड हवी आहे! अब्जाधीश व्यक्तीने गर्लफ्रेंडसाठी मागवले अर्ज, पण ठेवली 'ही' अट

जपानमधील एका अब्जाधीश व्यक्ती गर्लफ्रेंड मिळविण्यासाठी एक अजबच गोष्ट केली आहे. त्याने त्यासाठी तरुणींना अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. पाहा काय आहे हे प्रकरण: 

vacancy to become a billionaire girlfriend many conditions were kept for girls
गर्लफ्रेंड हवी आहे! अब्जाधीश व्यक्तीने गर्लफ्रेंडसाठी मागवले अर्ज, पण ठेवली 'ही' अट  |  फोटो सौजन्य: Representative Image

टोकियो: एका अब्जाधीश व्यक्तीला एक गर्लफ्रेंड हवी आहे. याआधी एक अभिनेत्री त्याची गर्लफ्रेंड होती. पण काही दिवसांपूर्वीच दोघे वेगळे झाले. त्यामुळे या अब्जाधीश व्यक्तीने गर्लफ्रेंड मिळविण्यासाठी चक्क भरती (Vacancy) काढली आहे. त्याने यासाठी अर्जाची मुदत १७ जानेवारीपर्यंत ठेवली आहे. पण याच वेळी त्याने काही अटी आणि शर्थी देखील ठेवल्या आहेत. 

अब्जाधीश व्यक्ती हा आपल्या गर्लफ्रेंडला थेट चंद्रावर घेऊन जाणार आहे त्यामुळे गर्लफ्रेंडसाठी अर्ज करणाऱ्या तरुणीला देखील चंद्रावर जाण्यामध्ये रुची असली पाहिजे. अशी प्रमुख अट या अब्जाधीश व्यक्तीने घातली आहे. 

जपानचा अब्जाधीश युसाका मॅजवा याने स्पेकएक्स रॉकेटच्या मदतीने चंद्रावर जाण्याची योजना तयार केली आहे. ४४ वर्षीय युसाकाला २० वर्षापेक्षा अधिक वयाची अविवाहित तरुणी गर्लफ्रेंड म्हणून हवी आहे. याबाबत त्याने आपल्या वेबसाइटवर लिहलं आहे की, 'जसं-जसं... एकटेपणा आणि रितेपणा माझ्या आयुष्यात वाढत चालला आहे तसं मी एका गोष्टीचा विचार करु लागलो आहे की, एखाद्या महिलेवर आपण प्रेम करावं.' यावेळी युसाकाने असंही म्हटलं आहे की, गर्लफ्रेंड रुपात त्याला आपली लाइफ पार्टनर हवी आहे. काही दिवसांपूर्वीच युसाकाने २७ वर्षाची अभिनेत्री अयमे गोरिकी हिच्याशी ब्रेकअप केलं. 

अमेरिकेतील अब्जाधीश एलन मस्क याच्या स्पेसएक्स रॉकेटच्या मदतीने युसाका हा चंद्रावर जाणारा पहिला खासगी प्रवासी असू शकतो. तो २०२२ मध्ये चंद्रावर जाऊ शकतो. त्यामुळे युसाकाची गर्लफ्रेंड बनण्यासाठी ज्या तरुणी अर्ज करणार आहेत त्यांना अंतराळ, खगोलशास्त्र या विषयांची आवड असणं गरजेचं आहे. 

तसंच अर्ज करणाऱ्या तरुणी चंद्रावर जाण्यास तयार हवी. तसंच यासाठी जी काही तयारी करावी लागेल त्यातही तिने भाग घेणं युसाकाला अपेक्षित आहे. तसचं तरुणीचे विचार हे जागतिक शांततेच्या बाजूने असले पाहिजे असंही त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे या सर्व अटी लक्षात घेऊनच तरुणींनी १७ जानेवारीपर्यंत अर्ज करावा असं युसाकाचं म्हणणं आहे. सर्व अर्ज आल्यानंतर युसाका त्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन मार्च महिन्याचा शेवटी आपल्या गर्लफ्रेंडचं नाव घोषित करणार आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी