वऱ्हाडींना 'कूल' वाटावं म्हणून लग्नाच्या वरातीत केली कूलरची सोय

varhad with cooler for wedding in summer watch viral video : लग्नाच्या वरातीत वऱ्हाडींना उकाड्याचा त्रास जाणवू नये म्हणून वऱ्हाडासोबत कूलर फिरवत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा चौदा सेकंदांचा व्हिडीओ आहे.

varhad with cooler for wedding in summer watch viral video
वऱ्हाडींना 'कूल' वाटावं म्हणून लग्नाच्या वरातीत केली कूलरची सोय 
थोडं पण कामाचं
  • वऱ्हाडींना 'कूल' वाटावं म्हणून लग्नाच्या वरातीत केली कूलरची सोय
  • चौदा सेकंदांचा व्हायरल व्हिडीओ
  • मध्य प्रदेशमधील घटना

varhad with cooler for wedding in summer watch viral video : उन्हाळ्यात घराबाहेर पडणे अनेकांना त्रासदायक किंवा कंटाळवाणे वाटते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे उकाड्याचा त्रास आणि सतत येणारा घाम. या समस्येवर रामबाण उपाय म्हणून कोणी भोवतालचे वातावरण थंड करणारे कूलर घेऊन फिरू लागले तर... ऐकायला विचित्र वाटेल पण हा अचाट प्रकार घडला आहे. ही भारतात घडलेली घटना आहे. लग्नाच्या वरातीत वऱ्हाडींना उकाड्याचा त्रास जाणवू नये म्हणून वऱ्हाडासोबत कूलर फिरवत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा चौदा सेकंदांचा व्हिडीओ आहे.

लग्नाच्या वरातीत बँडच्या तालावर नाचणाऱ्या वरातींना उकडू नये म्हणून मालवाहक सायकल गाडीवर कूलरची व्यवस्था केली आहे. जनरेटच्या मदतीने हे कूलर चालविले जात आहेत. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ मध्य प्रदेशमधील टीकमगड परिसरातील आहे. टीकमगडच्या 'अस्पताल चौराहा' नावाच्या चौकातून जात असलेल्या वरातीत कूलरची व्यवस्था केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. 

व्हिडीओ मंगळवारचा आहे. त्या दिवशी टीकमगडचे तापमान ४३.३ अंश से. होते. या अशा वातावरणात लग्नाच्या वरातीत नाचणे कठीण होते. पण वरात शांतपणे कशी जाणार म्हणून बँडच्या तालावर नाचणाऱ्या वरातींना 'कूल' करण्याची सोय करण्यात आली. जनरेटरच्या कूलर चालवून वऱ्हाडींना थोडे सुसह्य असे वातावरण तयार करण्यात आले.

वरातीसाठीच्या कूलरबाबत सोशल मीडियावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. बहुसंख्य नागरिकांनी कूलरची व्यवस्था करणाऱ्यांच्या युक्तीचे कौतुक केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी