जगातील पहिली महिला पायलट जी पायाने उडवते विमान, थेट गिनीज बुकात नोंद! 

व्हायरल झालं जी
Updated Apr 18, 2019 | 15:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

जगातील पहिली अशी महिला पायलट आहे की, जी आपल्या पायाने विमान उडवते. त्यामुळे तिची थेट गिनीज बुकात नोंद झाली आहे. 

woman_operating_plane_by_feet_facebook
जगातील पहिली महिला पायलट जी पायाने उडवते विमान, थेट गिनीज बुकात नोंद!   |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: जगभरात अशी अनेक लोकं आहेत जी आपल्यातील शारीरिक व्यंगावर मात करत एका नवा शिखरावर पोहचतात. ते आपल्यात असणाऱ्या  धैर्य आणि इच्छाशक्ती यामुळे इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेचा परिचय करुन देणार आहोत जी अशाच पद्धतीने दुसऱ्यांसाठी एक मोठी प्रेरणा ठरली आहे. या महिलेचं नाव जेसिका कॉक्स (Jessica Cox)असं आहे. ही जगातील पहिली आणि एकमेव महिला आहे की, जी आपल्या पायांनी विमान चालवते. जेसिका जवळ असं लायसन्स आहे जे जगातील पहिल्या आर्मलेस (हात नसलेल्या) पायलटला देण्यात आलं आहे. यामुळेच या महिलेचं नाव थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आलं आहे. 

जेसिकाला हात नसले तरीही ती त्या गोष्टीचा अजिबात बाऊ करत बसली नाही. तिने यावर मात करत अनेक गोष्टी पायानेच करणं शिकली. त्यामुळे ती आता पायानेच थेट विमान उडवू शकते. फक्त विमानच नाही तर ती अनेक कामं ही पायानेच करते.

(फोटो सौजन्य: फेसबुक)

अमेरिकेतील एरिझोना येथे जन्मलेल्या जेसिकाला जन्मत:च हात नाहीत. १४ वर्षापर्यंत तिने कृत्रिम हाताचा वापर केला होता. त्यानंतर तिने ते कृत्रिम हात देखील काढून टाकले आणि आपली सगळी कामं तिने पायाने करणं सुरू केलं. सुरुवातीला तिला या गोष्टीचा बराच त्रास देखील झाला. पण त्यावर मात करत ती आपली सर्व कामं पायानेच करू लागली. 

(फोटो सौजन्य: फेसबुक)

तेव्हापासून आजपर्यंत ती आपली सगळी कामं पायानेच करते. फक्त दररोजची घरातीलच कामे नव्हे तर कार चालवणं, डोळ्यांना लेन्स लावणं,  गॅस भरणं, ,काम्प्युटर चालवणं यासारखी एक नाही तर अनेक कामं ती फक्त पायाने करते. सामान्य व्यक्ती जी कामं करते ती सगळी कामं जेसिका कुणावरही उपलब्ध न राहता स्वत:ची स्वत: करते. ती कम्प्युटर २५ शब्द प्रति मिनिट एवढ्या वेगाने टाइप देखील करते. 

पाहा जेसिका पायाने कसं विमान उडवते याचा व्हिडिओ: 

 

 

जेसिकाचं वय ३४ वर्ष असून तिला इंटरनेट सर्फिंग, स्कूबा डायव्हिंग, घोडेस्वारी, यांची फार आवड आहे. एवंढच नव्हे तर ती लिखाण देखील पायानेच करते. तर आपल्या बुटांच्या लेस देखील जेसिका पायानेच बांधते. जेसिका ही वयाच्या २२व्या वर्षीच विमान चालवणं शिकली होती. त्यानंतर तीन वर्षातच म्हणजे वयाच्या २५ व्या वर्षी तिला लायसेन्स देखील मिळालं. जेव्हा जेसिकाचं लग्न झालं होतं तेव्हा तिच्या पतीने तिच्या पायामध्ये 'वेडिंग रिंग' घातली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
जगातील पहिली महिला पायलट जी पायाने उडवते विमान, थेट गिनीज बुकात नोंद!  Description: जगातील पहिली अशी महिला पायलट आहे की, जी आपल्या पायाने विमान उडवते. त्यामुळे तिची थेट गिनीज बुकात नोंद झाली आहे. 
Loading...
Loading...
Loading...