Viral Video : मी मुलाला खायला द्यावे की मारावे? पाकिस्तानच्या महिलेचा पंतप्रधानांना सवाल, पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Video of Pakistani Woman : पाकिस्तानातील महागाई आणि अर्थव्यवस्थेची बिकट (Pakistan Economy) स्थिती याचीही चर्चा होत असते. मात्र आता पाकिस्तानची आर्थिक स्थिती किती वाईट आहे यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. हा व्हिडिओ एका पाकिस्तानी महिलेचा आहे. पाकिस्तानातील कराची शहरातील एका महिलेने (Pakistani Woman) देशाची आर्थिक स्थिती अशा प्रकारे उघड केली आहे की, तिचा व्हिडिओ देशात व्हायरल होतो आहे.

Viral Video of Pakistani Woman
पाकिस्तानच्या महिलेचा व्हायरल व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानवर असलेल्या कर्जाच्या डोंगराबाबत नेहमीच बातम्या येतात
  • पाकिस्तानातील महागाई आणि अर्थव्यवस्थेची बिकट (Pakistan Economy) स्थिती याचीही चर्चा होते
  • पाकिस्तानातील कराची शहरातील एका महिलेने (Pakistani Woman) देशाची आर्थिक स्थिती उघड केली

Viral News : नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात, पाकिस्तानवर असलेल्या कर्जाच्या डोंगराबाबत  नेहमीच बातम्या येत असतात. पाकिस्तानातील महागाई आणि अर्थव्यवस्थेची बिकट (Pakistan Economy) स्थिती याचीही चर्चा होत असते. मात्र आता पाकिस्तानची आर्थिक स्थिती किती वाईट आहे यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. हा व्हिडिओ एका पाकिस्तानी महिलेचा आहे. पाकिस्तानातील कराची शहरातील एका महिलेने (Pakistani Woman) देशाची आर्थिक स्थिती अशा प्रकारे उघड केली आहे की, तिचा व्हिडिओ देशात व्हायरल होतो आहे. या महिलेने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनाही सुनावले की, तुम्ही मला सांगा, या महागाईत मी माझ्या मुलाला खायला द्यावे की त्याला मारावे? महिलेने व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आणि तो आता व्हायरल झाला आहे. (Video by Pakistani woman goes viral where she asked about economic condition)

अधिक वाचा : मेट्रो कारशेडच्या मुद्यावर उपमुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

वास्तविक, पाकिस्तान दीर्घकाळापासून आर्थिक संकट आणि महागाईच्या जाळ्यात अडकला आहे, हे खरे आहे. पाकिस्तानची स्थिती श्रीलंकेसारखी तर नाही ना, अशी भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या सगळ्यात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून बाजारातून परतल्यावर एका महिला कामगाराने तिची व्यथा मांडली.

शाहबाज शरीफना विचारला प्रश्न

या महिलेचा व्हिडिओ शेअर करताना पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर म्हणाले की, संपूर्ण पाकिस्तानने या महिलेचा आवाज ऐकावा अशी माझी इच्छा आहे. राबिया नावाच्या या महिलेचे म्हणणे आहे की, शाहबाज शरीफ आणि मरियमसारख्या जबाबदार पदांवर असलेल्या लोकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्यानंतर आम्ही खर्च कसा भागवायचा हे सांगावे. ती बाई भावूक होऊन म्हणते की मी माझ्या मुलांना खायला घालायचे की त्यांना मारायचे?

अधिक वाचा : छोटू भैय्याला केवळ बॅट-बॉलने खेळले पाहिजे..उर्वशीचा पंतला टोला

महागाईमुळे जगणे झाले कठीण

इतकंच नाही तर स्वतःबद्दल सांगताना ती महिला म्हणते की तिला दोन मुलं आहेत. एका मुलाला फीट येते आहे. त्याच्या उपचारासाठीच्या औषधांचा खर्च गेल्या चार महिन्यांत प्रचंड वाढला आहे. मी माझ्या मुलासाठी औषधे खरेदी करणे टाळू शकते का? त्यांनी पुढे असा सवाल केला की, सरकारने गरीब लोकांचा बळी घेतला आहे. खरंच तुम्हाला देवाची भीती वाटत नाही का?

अधिक वाचा : Office Tips: जेव्हा ऑफिसमध्ये आळस येतो तेव्हा लगेच करा ही गोष्ट, झोप होईल गायब

सध्या राबियाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही पण ऐका...

सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक व्हिडिओ, बातम्या लगेच व्हायरल होतात. जगाच्या एका कोपऱ्यातील माहिती दुसऱ्या कोपऱ्यात लगेच पोचते. त्यातच जर एखादी बातमी किंवा व्हिडिओ जर लक्ष वेधून घेणारा असेल किंवा सर्वसामान्यांच्या भावनांना हात घालणारा, भिडणारा असेल तर मग असे व्हिडिओ लगेचच व्हायरल होत असतात. सोशल मीडियाचा वापर करून या पाकिस्तानी महिलेने आपल्या दु:खांना आणि संकटांना लोकांसमोर व्यक्त केले आणि वाट मोकळी करून दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी