चालू चालक ; बाथरुममध्ये अंघोळ करताना महिला पोलीस अधिकाऱ्याचा बनवला व्हिडिओ

व्हायरल झालं जी
Updated Sep 30, 2021 | 12:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

महिला पोलीस अधिकाऱ्याच्या बाथरूममध्ये अंघोळ करत असताना ही घटना घडली. चालकाने मोबाईल तिथे ठेवला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर चालक फरार आहे.

Video in mobile made by the driver of a female police officer while taking a bath in the bathroom
चालकाने महिला पोलीस अधिकाऱ्याचा बनवला व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चालकाने आंघोळ करताना महिला पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप
  • त्याने महिला पोलिसांना ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केला.
  • आरोपींविरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये चालकाविरुद्ध महिला पोलीस अधिकाऱ्याला अश्लील वागणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाने आंघोळ करताना महिला पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. महिला पोलीस अधिकारी बाथरूममध्ये अंघोळ करत असताना हा  व्हिडिओ बनवण्यात आला.  चालकाने अधिकाऱ्याचा बाथरुममध्ये  मोबाईल ठेवला होता. दरम्यान  गुन्हा दाखल होताच चालक फरार झाला आहे.(Video in mobile made by the driver of a female police officer while taking a bath in the bathroom)

ही घटना भोपाळची आहे. आरोपी ड्रायव्हर एक पोलीस कॉन्स्टेबल आहे आणि भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. कॉन्स्टेबलवर महिला पोलीस अधिकाऱ्याने आंघोळ केल्याचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर त्याने महिला पोलिसांना ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केला. आरोपी कॉन्स्टेबलचे नाव भूपेंद्र सिंह असे आहे.

या घटनेनंतर महिला अधिकाऱ्याने एसपी मुख्यालयाशी संपर्क साधला आणि गुन्हे शाखाही या प्रकरणाशी संबंधित होती. आरोपींविरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी