Kacha Badam झालं जुनं, आता 'नमकीन वाले चाचां'चा Video व्हायरल एकदा पाहाच, पोट धरून हसाल

bhopali uncle namkeen video : कचा बदाम हे गाणे सर्वांनी ऐकलेच असेल, त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, त्यानंतर त्या गाण्यावर रिल्स येऊ लागल्या. आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक चाचा नमकीन विकत आहेत, त्यांची विक्री करण्याची शैली खूप वेगळी आहे. हे काका भोपाळचे आहेत आणि नमकीन विकण्याच्या पद्धतीनं सगळ्यांना आकर्षित करत आहेत.

Video: Kacha Badam is old, Namkeen uncle is becoming very viral
Kacha Badam झालं जुनं, आता 'नमकीन वाले चाचां'चा Video व्हायरल एकदा पाहाच, पोट धरून हसाल ।   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • कच्चा बदाम हे गाणे खूप व्हायरल झाले झाले
  • आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे,
  • नमकीन चाचांची शैली खूप वेगळी आहे.

 bhopali uncle video : 'कच्चा बदाम' वाले भुबन आठवतायत? होय, तेच ज्यांच्या गाण्यावर रील्सचा महापूर वाहून आला होता! केवळ इन्स्टाग्रामवरच नव्हे, तर लग्न आणि पार्ट्यांमध्येही हे गाणे डीजेची पसंती ठरले. तसे, यानंतर सोशल मीडियाच्या जगात अनेक भाजीपाला आणि फळ विक्रेते ट्रेडिंग झाले. कारण त्यांची वस्तू विकण्याची शैली खूप वेगळी होती. आता भोपाळमधून एक जबरदस्त व्हिडिओ समोर आला आहे, जिथे एक चाचा नमकीन विकतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ तुम्हीच पहा. माझ्यावर विश्वास ठेवा हा तुमचा दिवस मस्त जाईल!

अधिक वाचा : Viral: कारमध्ये विवस्त्र होऊन सुरु होता रोमान्स, चोरांनी तरुण-तरुणीला नग्नच रस्त्यावर सोडलं अन् कार पळवली!

@manishbpl1 या ट्विटर हँडलवरून २ सप्टेंबरला व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - भोपाळी नमकीन वाला... भोपाळमध्ये प्रतिभेची कमतरता नाही. मी तुम्हाला सांगतो, बातमी लिहिपर्यंत या ट्विटला एक हजाराहून अधिक लाईक्स आणि सुमारे दोनशे रिट्विट्स मिळाले आहेत. तर चाचाची क्लिप तीस हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. आणि हो, भाऊ... काही लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. 

'अमेझिंग कंपनीचे नमकीन...'

ही क्लिप ४५ सेकंदांची आहे. बजाजच्या 'क्लासिक' स्कूटरवर एक वयोवृद्ध चाचा बॅग घेऊन बसलेले दिसतात. त्याच्याकडे अप्रतिम स्वॅग आहे. त्यांनी टोपी घातली आहे ज्यावर BOY लिहिलेले आहे. एवढेच नाही तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते ज्या पद्धतीने आवाज काढताय ते ऐकून संपूर्ण सोशल मिडिया युजर्स त्यांचे चाहते झाले आहेत. चाचा गाऊन लोकांना सांगतात की ते नमकीन विकत आहेत. बाकी व्हिडीओ पाहिल्यावर चाचा काही साधासुधा माणूस नसून 'कच्चा बदाम' वाल्या भुबन बड्याकरपेक्षा दोन पावले पुढे आहे हे समजेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी