Viral Video : फ्रेंच, रशियन आणि ब्रिटीश हिंदी बोलू लागले तर काय होईल? पाहा या व्हिडिओत…

भारतीय लोकं इंग्रजी कसं बोलतात, हे आपण अनेकदा ऐकतो. पण परदेशी लोकं हिंदी कसं बोलतील, हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Viral Video
फ्रेंच, रशियन आणि ब्रिटीश बोलू लागले हिंदी  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • हिंदी भाषा पण उच्चार विदेशी
  • फ्रेंच, रशियन, ब्रिटीश भाषेत हिंदी
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Viral Video : प्रत्येक देशात (Country) वेगवेगळी भाषा (Language) बोलली जाते. काही देशांमध्ये एकच भाषा बोलली जाते, मात्र ती भाषा बोलण्याची पद्धतही प्रत्येक देशात वेगवेगळी असते. या वेगळेपणालाच ‘ॲक्सेंट’ (Accent) असं म्हणतात. इंग्रजी (English) ही जगातील बहुतांश देशांत बोलली जाणारी भाषा आहे. मात्र जगाच्या वेगवगेळ्या खंडातील आणि देशातील लोक वेगवेगळ्या प्रकारे इंग्रजी भाषेचा उपयोग करतात. अनेकदा आपल्या देशातील भाषेचा लहेजा इतका अंगवळणी पडतो की भाषा बदलली तरी लहेजा बदलत नाही. मूळ भाषेच्या लहेजातच इतर भाषा बोलण्याचा प्रयत्न होतो आणि ही बाब अनेकांना मजेशीर वाटते. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य हे तिघेही जेव्हा इंग्रजी भाषेत बोलतात, तेव्हा त्यांच्या मातृभाषेचा प्रभाव इंग्रजी उच्चारांवरही होत असतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Ahilya Bamroo (@ahillyeah)

तरुणीने केली कमाल

भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील लोक कसे इंग्रजी बोलतात, यावरचे विनोद आपण यापूर्वी अनेकदा ऐकले असतील. मात्र परदेशातील लोक जर हिंदी बोलू लागले, तर ते कसे बोलतील हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एक तरुणी जगातील वेगवेगळ्या देशातले लोक हिंदी भाषेत कसे बोलतील, याचा अभिनय करून दाखवत आहे. 

अधिक वाचा - Viral Video : वृद्धत्व आले मात्र एकमेकांवरील निस्सीम प्रेम तसेच...वृद्ध जोडप्याचा भारावून टाकणारा व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हिडिओ

अस्सल नक्कल

जी नक्कल अस्सलपणे केली जाते, ती सर्वोत्कृष्ट नक्कल असते असं म्हणतात. सोशल मीडियावर व्यक्तींची नक्कल करणारे हजारो व्हिडिओ नेहमीच अपलोड होत असतात. मात्र या तरुणीनं कुठल्याही व्यक्तीची नव्हे, तर भाषेची आणि त्या त्या लहेजाची हुबेहूब नक्कल केल्याचं या व्हिडिओत दिसतं. त्यामुळेच हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीला उतरला असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत 2.4 मिलियनपेक्षा अधिक वेळा तो पाहिला गेला आहे. 

अधिक वाचा - Viral Video : कलियुगातील आधुनिक श्रावणबाळ, आईवडिलांना घेऊन कावडयात्रा

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

आपल्याला परकीय देशांतील उच्चारांचा वापर करून हिंदी बोलण्याचा केलेला अभिनय भलताच आवडल्याची प्रतिक्रिया युजर्सनी दिली आहे. काहीजणांनी तिला असे व्हिडिओ वारंवार बनवण्याचा सल्ला दिला आहे, तर काहींनी तिच्या अभिनय कौशल्याला दाद दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी