Chand Nawab Video: पाकिस्तानचा पत्रकार (Pakistani Reporter) चांद नवाव (Chand Nawab) आपल्याला माहित असेलच. काही वर्षांपूर्वी एका रेल्वे स्टेशनच्या पायरीवर उभं राहून त्याने केलेला व्हिडिओ जोरदार (Video Viral) गाजला होता. भारत पाकिस्तानसह इतरही अनेक देशात हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि लोकांनी या व्हिडिओची भरपूर मजा लुटली होती. आता याच चांद नवाबचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी नवाब साहेब थेट पुराच्या पाण्यात उतरून रिपोर्टिंग (Reporting of flood) करताना दिसत आहेत. पाकिस्तानमध्ये रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडिओ अल्पावधीतच लोकप्रिय झाला असून लोकांकडून जोरदार फॉरवर्ड केला जात आहे.
Dangerous,deadly,killer #Pakistani #Reporting.. — Anurag Amitabhانوراگ امیتابھअनुराग अमिताभ (@anuragamitabh) August 27, 2022
There is #FloodinPakistan and news channels,army and #ImranKhan too
All 4 become uncontrollable,can do anything..#PakistanFloods #PakArmy #flood pic.twitter.com/aI5KeRsiwL
गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानमध्ये पूरपरिस्थिती आहे. अनेक रिपोर्टर या पुराचं रिपोर्टिंग करत आहेत. पाकिस्तानमधील वेगवेगळ्या प्रांतात जाऊन वेगवेगळ्या प्रकारचं रिपोर्टिंग सध्या केलं जात आहे. मात्र या सगळ्यात सर्वाधिक गाजतंय हे चांद नवाबचं रिपोर्टिंग, अगदी छातीपर्यंत भरलेल्या पाण्यात चांद नवाब उतरला आहे आणि पाकिस्तानमधील पूरपरिस्थितीची मांडणी करताना या व्हिडिओत दिसत आहे. एका प्रसंगी तर चांद नवाबच्या गळ्यापर्यंत पुराचं पाणी आलं आहे. त्यानं कसाबसा माईक सांभाळला आहे आणि जीव धोक्यात घालत तो प्रेक्षकांना पुराची कल्पना देत आहे. रिपोर्टिंग करताना आपल्या जीवाची बिलकूल फिकिर न करणारा चांद नवाब सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरत आहे.
खरं तर पूरपरिस्थिती ही फार गंभीर समस्या आहे. एखाद्या भागात जेव्हा पूर येतो, तेव्हा सर्वसामान्यांचं जगणं कठीण होतं. अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात आणि पुराचे परिणाम पुढील काही महिने जाणवत राहतात. अशा गंभीर परिस्थितीत चांद नवाबच्या रिपोर्टिंगमुळे हास्याची कारंजी फुलताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.