Dance in Metro : मेट्रो ट्रेनमध्ये तरुणीचे ठुमके, व्हिडिओवरील प्रतिक्रिया तर डान्सपेक्षाही भन्नाट

मेट्रो ट्रेनमध्ये डान्स करावा की नाही, यावरून सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेचं निमित्त ठरलाय एक व्हिडिओ.

Dance in Metro
मेट्रो ट्रेनमध्ये तरुणीचे ठुमके  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मेट्रो ट्रेनमध्ये तरुणीचे ठुमके
  • अनेकांनी घेतला आक्षेप
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Dance in Metro : मेट्रो ट्रेनमध्ये (Metro Train) मनसोक्त डान्स (Dance) कऱणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियात (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. वास्तविक, असे अनेक व्हिडिओ दर मिनिटाला सोशल मीडियावर अपलोड होत असतात. मात्र त्यापैकी काही व्हिडिओ हे अनेकांचं लक्ष वेधून घेणारे ठरतात आणि त्यांची जोरदार चर्चा सुरू होते. विशेषतः त्या व्हिडिओचा संबंध एखाद्या सार्वजनिक प्रश्नाशी असेल, तर अनेकजण त्यावर आपलं मत व्यक्त करू लागतात आणि पाहता पाहता व्हिडिओ व्हायरल होतो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून तो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

मेट्रो रेल्वेत केला डान्स

हा व्हिडिओ हैदराबादमधील मेट्रो ट्रेनमधील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओत एक तरुणी मेट्रो ट्रेनमध्ये उभी असते. तिच्या पाठिमागे नेहमीप्रमाणे अनेक प्रवासी मेट्रोतून प्रवास करत आहेत. एका क्षणी ही तरुणी म्युझिक ऑन करायला सांगते आणि संगीताच्या तालावर ठेका धरते. हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर त्यावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडू लागला आहे. असा व्हिडिओ करणे योग्य की अयोग्य यावरून युजर्स एकमेकांना जोरदार भिडल्याचं चित्र दिसत आहे. 

अधिक वाचा - Viral Video : पतीच्या मोबाईलमध्ये वाजला अलार्म, पत्नीने ‘असं’ झोपवलं की पुन्हा उठलाच नाही

अनेकांचा व्हिडिओला विरोध

सार्वजनिक वाहतुकीने सर्व स्तरातील प्रवासी प्रवास करत असतात. त्यातील अनेकांना अशा प्रकारामुळे अवघडून जायला होतं. कुणाचीही परवानगी न घेता अशा प्रकारे अचानक कुणीही कसाही डान्स करू लागलं, तर त्याचा इतर प्रवाशांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे सार्वजनिक वाहनांत डान्स करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. काहीजणांनी हा ट्रेंड योग्य नसल्याचं म्हटलं आहे. यामुळे नको त्या प्रकाराचा चालना मिळेल आणि इतरांनाही असंच करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी भिती काहींनी व्यक्त केली आहे. एका सार्वजनिक वाहनात डान्स करण्याची परवानगी कशी काय दिली जाते, असा सवाल एका युजरने केला आहे. तर आणखी एकाने मेट्रो रेल्वेला टॅग करत असा डान्स करण्यासाठी परवानगी घेण्याची प्रक्रिया काय असते, असा उपहासात्मक प्रश्न विचारला आहे. 

अधिक वाचा - वारंवार जुळ्यांना जन्म देणाऱ्या मातेच्या बाबतीत घडली अनपेक्षित घटना

अनेकांकडून समर्थन

अनेकांनी या डान्स व्हिडिओचं समर्थन केलं आहे. जर कुणालाही कुठलाही त्रास न होता तरुणी तिचा प्रवास एन्जॉय करत असेल, तर त्यावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नसल्याचं काही युजर्सनी म्हटलं आहे. तर काहींजणांनी तरुणीच्या स्टेप्स फारच आवडल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी