Kiss to Cobra : तरुणीनं कोब्राला किस करण्यासाठी चेहरा जवळ नेला आणि… पाहा VIDEO

कोब्रा नागाचं नाव काढलं तरी अनेकांना घाम फुटतो. मात्र एका तरुणीने या महाभयंकर नागाला वश करत त्याला किस करून दाखवला. याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Kiss to Cobra
मुलीनं कोब्राला किस करण्यासाठी चेहरा जवळ नेला आणि…  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तरुणीचा कोब्रा नागाला किस करण्याचा प्रयत्न
  • वाढली प्रेक्षकांची धाकधूक
  • प्रचंड धोका असलेलं काम केलं फत्ते

Kiss to Cobra : साप किंवा नाग (Snake) असा शब्द जरी उच्चारला तरी अनेकांना भिती (Fear) वाटते. सापाच्या भितीनं लोक त्यापासून दूर राहणंच पसंत करतात. लांबून जरी साप दिसला तरी अनेकांना घाम फुटतो. सापाला खरं तर शेतकऱ्याच्या मित्र म्हटलं गेलं असलं तरी त्याच्यात असणाऱ्या विषारी गुणधर्मांमुळे अनेकांना सापांची भिती वाटत असते. साप चावला आणि तो जर विषारी असेल तर माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे सापाच्या जवळ  जाण्याच्या विचारानेही अनेकांची पाचावर धारण बसते. मात्र सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, जो पाहून भल्याभल्यांचा श्वास रोखला गेला आहे. एका तरुणी महाविषारी समजल्या जाणाऱ्या कोब्रा नागाला (King Cobra) किस (KIss) करण्याचा प्रयत्न करतानाच हा व्हिडिओ आहे. 

तरुणी बसली नागासमोर

या व्हिडिओत तरुणी नागाच्या अगदी समोर काही इंच अंतरावर बसली आहे. कोब्रा नाग फणा काढून तिच्यासमोर उभा आहे. ही तरुणी आपला चेहरा नागाच्या चेहऱ्याजवळ नेण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. हा व्हिडिओ सुरु होताच प्रेक्षकांच्या मनात एक भिती दाटून येते आणि आता हा नाग तरुणीला चावणार तर नाही ना, अशी शंका प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. कोब्रा नाग चावला तर काही मिनिटांतच माणसाचा मृत्यू होऊ शकतो, हे आता सर्वांना माहित आहे. असं असूनही या सापाच्या इतक्या जवळ चेहरा घेऊन जाणारी ही तरुणी पाहून सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढू लागतात. ही तरुणी आता पुढं काय करणार आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे हा साप पुढं काय करणार, असे प्रश्न सर्वांना पडायला सुरुवात होते. 

अधिक वाचा - Viral News : अबब! हस्तमैथुन कसे केले यावर सादर केली पीएचडी...परवानगी दिल्याबद्दल विद्यापीठावर टीका

काळ्या कापडाची जादू

या व्हिडिओत तरुणीचं आपल्यासोबत एक काळ्या रंगाचं कापडही घेतलं आहे. सापाचं लक्ष इतरत्र जाऊ नये आणि आजूबाजूच्या कुठल्याही गोष्टीचा प्रभाव सापावर पडू नये, हा त्यामागचा उद्देश असतो. सापाचं लक्ष पूर्णपणे आपल्याकडे खेचून घेणं आणि त्याला मानसिकरित्या वश करून आपल्या मर्जीप्रमाणे वागायला भाग पाडणं, या कलेचाच तो एक भाग आहे. त्यानुसार काळ्या कापडाचा वापर करून तरुणी कोब्राचं लक्ष स्वतःकडे वेधून घेते. 

अधिक वाचा - Viral Video : मी मुलाला खायला द्यावे की मारावे? पाकिस्तानच्या महिलेचा पंतप्रधानांना सवाल, पाहा व्हायरल व्हिडिओ

चेहरा जवळ नेत केला किस

त्यानंतर हळूहळू एका संथ गतीने आपला चेहरा कोब्राच्या जवळ नेत असताना तरुणी दिसते. या क्षणी तर सर्वाधिक धाकधूक वाटायला सुरुवात होते आणि आता नाग कसा रिॲक्ट करेल, याचीच भिती वाटू लागते. त्यानंतरच्या काही क्षणात तरुणीने आपला चेहरा कोब्राच्या चेहऱ्यापाशी नेऊन त्याला किसदेखील केलेला दिसतो. त्यानंतर सर्वजण सुटकेचा निश्वास सोडतात. तरुणीने कोब्राला किस केलं, हे चांगलंच झालं. पण चुकून कोब्राने तिला किस केलं असतं, तर काय झालं असतं, अशी चर्चा युजर्सनमध्ये रंगली आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी