Viral: ऐकावं ते नवलच! लग्न लागताच नवरा-नवरी असे लागले पळू; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Viral Funny Video | सोशल मीडियाचं विश्वच खूप वेगळं आहे, इथे कधी काय पाहायला, ऐकायला मिळेल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. काहीवेळा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी इतक्या मजेदार असतात की लोक त्या पुन्हा पुन्हा पाहतात.

Video of husband and wife running away after marriage goes viral
लग्न लागताच नवरा-नवरी असे लागले पळू, पाहा व्हिडिओ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लग्न लागताच वधु-वरांनी घेतली धाव.
  • सध्या त्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
  • वधू-वर ज्या पद्धतीने धावताना दिसतात ते पाहून लोक हास्यास्पद प्रतिक्रिया देत आहेत.

Viral Funny Video | नवी दिल्ली : सोशल मीडियाचं विश्वच खूप वेगळं आहे, इथे कधी काय पाहायला, ऐकायला मिळेल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. काहीवेळा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी इतक्या मजेदार असतात की लोक त्या पुन्हा पुन्हा पाहतात. तसेच काही व्हिडिओ आश्चर्यकारक देखील असतात. दरम्यान सध्या सोशल मीडियावर वधू-वरांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि हसत आहेत. कारण लग्नानंतर धुळीच्या रस्त्यावर हे जोडपे ज्या पद्धतीने धावताना दिसत आहे, त्यावरून लोकांचा याच्यावर विश्वासच बसत नाही. (Video of husband and wife running away after marriage goes viral). 

अधिक वाचा : भारतीय टपाल विभागात ३८,९२६ जागांसाठी भरती

आपल्या सर्वांना माहित आहे की लग्नामध्ये अनेक प्रकारचे विधी केले जातात. अनेकवेळा अशी दृश्ये पाहायला मिळतात, जे पाहून लग्नाला आलेले पाहुणेही थक्क होतात. पण आता व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळंच असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही वधू-वर धुळीने भरलेल्या रस्त्यावरून धावताना पाहू शकता. त्यांच्यासोबत काही लोक देखील आहेत. त्याचवेळी कार चालक पुढे कार घेऊन जाताना दिसत आहे. आता वधू-वर गाडी पकडण्यासाठी धावत आहेत की काही विधी करत आहेत यावरून नेटकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

अधिक वाचा : सिक्स पॅक ॲब्स बनवण्यासाठी डंबेलच्या मदतीने करा हे ५ व्यायाम

नवरा-नवरीचा भन्नाट व्हिडिओ

वधू-वर ज्या पद्धतीने धावताना दिसतात ते पाहून लोक हास्यास्पद प्रतिक्रिया देत आहेत. यासोबतच युजर्स हा व्हिडिओ इतरत्र शेअर करत आहेत. इंस्टाग्रामवर 'rkkhan6549' नावाच्या आयडीवरून शेअर केलेला हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला चार लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. व्हिडिओ पाहून कोणीतरी म्हणतं की ही प्रथा आहे. तर काही लोकांचे म्हणणे आहे की हा वधू-वरांवर अन्याय आहे. दरम्यान या व्हिडिओमागील सत्य अद्याप समोर आले नसले तरी या व्हिडिओने नेटकऱ्यांचे मनोरंजन केले आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी