King Cobra Dance Viral Video । मुंबई : अनेक लोकांना डान्स करायला खूप आवडते काही लोक तर डान्स करण्यासाठी इतके शौकीन असतात की गाणं वाजलं की लगेच ठेका धरतात. मात्र लग्नसोहळ्यात, पार्टीमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमात एका डान्सची विशेष चर्चा होत असते तो म्हणजे नागिन डान्स (Nagin Dance Video). काही लोकांमध्ये नागिन डान्सचे भुत असे काही शिरते ते पाहून पाहणारे लोक देखील चकीत होतात. सोशल मीडियावर (Social Media) नागिन डान्स केलेल्या अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. (Video of King cobra's romantic dance is going viral on social media).
अधिक वाचा : PUNE MNS : साईनाथ बाबर पुणे मनसेचे नवे शहरप्रमुख
मात्र आज आपण ज्या डान्सच्या व्हिडिओ बाबत भाष्य करणार आहोत तो डान्स खूपच वेगळा आहे. कारण या व्हिडिओमध्ये चक्क नाग रोमॅंटिक डान्स करत आहे त्याला लोकांची खूप पसंती देखील मिळत आहे. दरम्याना नागाच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
तुम्ही लोकांना अनेकदा नाचताना पाहिलं असेल, पण आता कोब्राही 'डान्स' करताना पाहा. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन किंग कोब्रा समोरासमोर दिसत आहेत. दोघेही हळू हळू वर वर येत आहेत. यानंतर दोघेही थोडे जवळ येतात आणि हालचाल करू लागतात. काही क्षणांनंतर दोघेही असे डान्स करतात, ते पाहून असे वाटते की दोघेही आनंदाने नाचत आहेत. कोब्राला नाचताना पाहून लोक दंग झाले आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत.
असा डान्स तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. हा डान्स व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'snake_unity' नावाच्या युजर्सकडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काही लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे, तर काही लोक आश्चर्यचकितही झाले आहेत. दरम्यान हा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.