Talented Kid : ओ माय गॉड! या चिमुकल्याची कला पाहून भलेभले झाले गारद, पुन्हा पुन्हा पाहतायत हा व्हिडिओ

लहानपणापासूनच निसर्गानं दिलेली कला जोपासली तर काय चमत्कार घडू शकतो, याचं उदाहरण सध्या एका व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. एका मुलाचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Talented Kid
ओ माय गॉड! या चिमुकल्याची कला पाहून भलेभले झाले गारद  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चिमुकल्याचा अनोखा स्टंट
  • काय तो बॅलन्स, काय ती नजाकत!
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Talented Kid | जगात प्रत्येकजण काही ना काही गुण घेऊन जन्माला येतो, असं म्हणतात. काहीजण आपल्याला मिळालेल्या नैसर्गिक गुणांची जोपासना करतात, तर बहुतांश जणांचे असे गुण काळाच्या ओघात लुप्त होऊन जातात. मात्र काहीजणांकडे निसर्ग अशी काही कला देेतो, की पाहणारा थक्क होऊन जातो. जगात लहानांपासून वृद्धांपर्यंत अशा अनेक टॅलेंटेड व्यक्ती आपल्याला दिसतात. सोशल मीडियावर तर अशा व्यक्तींचे आणि त्यांच्या कलांचे अनेकानेक व्हिडिओ अपलोड होत असतात. मात्र सध्या गाजत असलेल्या लहान मुलाचा हा व्हिडिओ सगळ्या भाऊगर्दीपेक्षा वेगळा आहे. 

मुलाने केली कमाल

व्हिडिओत हा मुलगा एका टेबलसदृश वस्तूवर ठेवलेल्या एका लाकडी फळीवर उभा असल्याचं दिसतं. लाकडी फळीवर तो आपला तोल सावरून उभा असतो आणि पायाने ती फळी हलवत बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या डोक्यावर आणि फळीच्या पुढच्या बाजूला काही प्लेट ठेवलेल्या आहेत. अगोदर तर अशा प्रकारे डोक्यावर प्लेट ठेऊन फळीवर उभं राहणं हीच मोठी कला आहे, असं आपल्याला वाटतं. मात्र खरं कसब तर पुढे असतं. 

अधिक वाचा -  Viral Video : दोन सापांची लढाई, एकाने दुसऱ्याला गिळले

मुलाने केली धमाल

काही वेळ हा मुलगा डोक्यावर काही प्लेट्स आणि तो उभ्या असलेल्या फळीवर काही प्लेट्स ठेऊन बॅलन्स कऱण्याचा प्रयत्न करत असतो. तो पुढे काय करणार आहे, याचा अजिबातच अंदाज हा व्हिडिओ पाहताना सुुरवातीला येत नाही. हळूहळू तो आपला बॅलन्स अधिक पक्का करत जातो आणि एका क्षणी कमाल घडते. हा मुलगा फळीवर समोरच्या बाजूला ठेवलेल्या प्लेट्स पायाच्या झटक्यासरशी हवेत उडवतो आणि त्या सगळ्या प्लेट्स एकामागून एक डोक्यावर ठेवलेल्या प्लेटवर उपड्या जाऊन बसतात. 

अधिक वाचा - Leopard Jump Video : माकडाच्या शिकारीसाठी बिबट्याची अनोखी उडी, VIDEO पाहून सगळेच थक्क

पुन्हा पुन्हा पाहिला जातोय व्हिडिओ

फळीवर बॅलन्स करणं हीच मुळात मोठी कला आहे. त्यात हा मुलगा हवेत प्लेट्स भिरकावतो आणि त्याकडे न पाहता अलगद आपल्या डोक्यावरील प्लेट्सच्या ढिगावर त्या प्लेट्स आणून बसवतो. पहिल्यांदा व्हिडिओ पाहताना या मुलानं नेमकं काय केलं, हेही समजत नाही. त्यासाठी हा व्हिडिओ दुसऱ्यांदा पाहावा लागतो. त्यानंतर मात्र अनेकजण मुलाच्या या कलेच्या प्रेमात पडतात आणि वारंवार हा व्हिडिओ पाहत राहतात.

व्हिडिओ होतोय व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत असून त्याच्यावर कौतुकाचा, कमेंट्सचा आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी