Shocking Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज वेगवेगळे व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होत असतात. त्यातली काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही फारच गंभीर असतात. मात्र काही व्हिडिओ हे घडलेली परिस्थिती दाखवणारे असतात. अनेकदा काही लोक सार्वजनिक ठिकाणी असे काही विचित्र वागतात की त्यामुळे इतरांची भलतीच पंचाईत होते. अशा वेळी नेमकं काय करावं, हे अनेकांना समजत नाही. काहीजण शांतपणे त्या गोष्टी पाहत बसतात, तर काहीजण त्याला विरोध करतात. धावत्या मेट्रो ट्रेनमध्ये (Running metro train) जर कुणी अंघोळ (Bath) करायला सुरुवात केली तर तुम्ही काय कराल? सुरुवातीला तर या प्रकाराची कल्पना करणंही अवघड जाईल. मात्र अशी एक घटना नुकतीच घडली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका व्यक्तींने धावत्या मेट्रो ट्रेनमध्ये बाथटब ठेवला आणि त्यात चक्क अंघोळ करायला सुरुवात केली.
New York is not a real place pic.twitter.com/sUjvFBh1If — ENTERTAINMENT NETWORK (@dailyinstavids) August 25, 2022
व्हिडिओमध्ये मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी दिसतात. सगळेजण तयार होऊन आपापल्या कामासाठी निघाले आहेत. त्यात एक उघडीबंब व्यक्ती दिसते. मेट्रो ट्रेनच्या मधल्या रिकाम्या जागेत तिने एक बाथटब ठेवल्याचं दिसतं. त्यात बसून ती व्यक्ती चक्क ‘गंगे-भागीरथी’ स्टाईलनं अंघोळच करायला सुरुवात करते. काही वेळ त्याचा हा प्रकार पाहिल्यानंतर लोकांच्या डोक्यात तिडीक जायला सुरुवात होते. ती व्यक्ती मात्र आपल्याच धुंदीत अंगावर पाणी ओतून घेत शुर्चिर्भूत होण्यात मग्न असल्याचं दिसतं. स्नानतन्मयतेच्या नादात आपण इतरांच्या अंगावर पाणी उडवतो आहोत, याचं त्या व्यक्तीला काही भान उरत नाही. मात्र यामुळे आजूबाजूला उभ्या असणाऱ्या प्रवाशांचा संताप होतो आणि ते अशा प्रकारच्या शाही स्नानाला आक्षेप घेतात.
अधिक वाचा - Volcano eruption: ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अतिभयंकर VIDEO, पाहा एका दगडाचं काय झालं..
सुरुवातीला अंघोळीला आक्षेप घेणाऱ्या काही व्यक्तींसोबत अंघोळबाजाची हमरीतुमरी होते. त्यानंतर हा काही अंघोळ करायचं थांबवणार नाही, हे लक्षात आल्यामुळे लोक आक्रमक होतात आणि हाणामारीला सुरुवात होते. बाथटबमध्ये सतत पाय घसरत असल्यामुळे त्याला नीट हाणामारीदेखील करता येत नाही. तेवढ्यात लोक बुक्क्यांच्या आणि चापट्यांचा प्रसाद त्याला देऊ करतात. अखेर जनभावनेपुढे हा अंघोळबहाद्दर शऱणागती पत्करतो आणि बाथटबातून बाहेर पडतो.
अधिक वाचा - Optical Illusion: फोटोत लपले आहे ३ पायाचे घोडे, १० सेकंदात दाखवा शोधून
ज्या प्रकारे हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे, ते लोकांना भलतंच आवडलं आहे. न्यूयॉर्क शहरातील हा व्हिडिओ असावा, अशी चर्चा आहे. सध्या हा व्हिडिओ भलताच व्हायरल होत असून या प्रकाराची लोक मजा घेत आहेत.