Viral Video : एका घराच्या छतावर बसून माकड (Monkey) कपडे धूत असल्याचा (washing clothes) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Social media viral) होत आहे. माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस तयार झाला, असं सांगितलं जातं. त्यामुळे माकडाचे अनेक गुण आजही माणसांत दिसतात. मात्र माणसाचे काही गुण माकडही घेत असल्याचं या व्हिडिओतून दिसून येत आहे. सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ अपलोड होत असतात. त्यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात, तर काही गंभीर आणि विचार करायला भाग पाडणारे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून त्यात कपडे धुणाऱ्या माकडाला पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे.
## When my pet monkey wash clothes like human pic.twitter.com/H0bH0iVAEH — (@farhad55526050) September 20, 2019
या व्हिडिओत एका घराच्या छतावर बसून माकड कपडे धुताना दिसतं. त्याच्यापाशी पाण्याने भरलेली बादली, कपडे धुण्याचं साबण, ब्रश आणि काही कपडे असं साहित्य असल्याचं दिसतं. एखाद्या धुणीभांडी करणाऱ्या सराईत व्यक्तीप्रमाणे माकड आपलं काम करत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. अगोदर हे माकड हातात एक कपडा घेतं आणि तो समोरच्या दगडावर आपटून आपटून धुवायला सुरुवात करतं. आपल्या आजूबाजूला कोण आहे किंवा नाही, आपल्याला कपडे धुताना कुणी पाहतंय किंवा नाही, याचा कुठलाही विचार न करता कपडे धुण्याचा आनंद माकड लुटत राहतं आणि हातातील कापड दगडावर आपटून साफ करत राहतं.
अधिक वाचा - Inspiring Woman : लेकरांना कडेवर घेऊन करते फूड डिलिव्हरी, सोशल मीडियावर झाला Video Viral
माकड हे अनुकरणप्रिय असल्याचं अनेकदा सांगितलं जातं. माणसं जसं करतात, त्याचं अनुकरण किंवा नक्कलही माकड करत असल्याची उदाहरणं आपण पाहतो. टोपीवाला आणि माकडाची गोष्ट तर सर्वांनाच माहित असते. माकडे नक्कल करतात, या तत्त्वावर आधारित असलेली ही गोष्ट हा व्हिडिओ पाहताना आठवते. कुठल्या तरी माणसाला त्याने अशा प्रकारे कपडे धुताना बघितलं असावं. सतत काही दिवस अशा पद्धतीने कपडे धुणाऱ्या माणसांना पाहून या प्रकाराची उत्सुकता माकडालाही वाटली असावी, असं सांगितलं जातं. त्यामुळे जेव्हा माकडाला तशी संधी मिळाली, तेव्हा त्याने आपटून आपटून कपडे धुण्याचा आनंद लुटल्याचं या व्हिडिओतून दिसून येतं.
अधिक वाचा - Use of Brain : पोलीस करत होते पाठलाग, त्याने चालवलं डोकं, पाहा VIDEO
माकड कपडे धूत असल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेक युजर्स हा व्हिडिओ पाहून आपल्या हसूही रोखू शकत नसल्याचं म्हणत आहेत. असं माकड असेल तर वॉशिंग मशीनची गरजच काय, असा मिश्किल सवालही एका युजरने केला आहे. तर हे माकड एखाद्या व्यावसायिकापेक्षा कमी सराईत नाही, असं म्हणत काहीजणांनी माकडाचं कौतुकही केलं आहे.