Latest Trending Video : नवी दिल्ली : जरी बहुतेक लोक प्रेमाला (Love) तरुणपणाशी जोडतात आणि मानतात की या वयात प्रेम सर्वात जास्त आहे, परंतु तो फक्त एक पैलू आहे. वडिलधाऱ्यांच्या प्रेमाशी निगडीत अशा बातम्या आणि व्हिडिओ वेळोवेळी आपल्या समोर येत राहतात ज्यावरून प्रेमाला वयाची मर्यादा नसते. सोशल मीडियावर (Social Media) अनेकवेळा यासंदर्भातील पोस्ट किंवा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. खरं तर प्रेम हे सर्व मर्यादांच्या पलीकडे असते. कधी-कधी असं होतं की, ज्येष्ठांचे प्रेम तरुणांना खूप काही शिकवून जाते. मागील काही दिवसांपासून असाच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध जोडपे पावसात एकाच छत्रीच्या सहाय्याने रस्त्यावरून जात आहे आणि एकमेकांची काळजी घेत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्स भारावून गेले आहेत. या व्हिडिओमध्ये काय खास आहे ते पाहूया. (Video of old couple with true love goes viral on social media)
एका युजरने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वृद्ध जोडपे पावसात रस्ता ओलांडताना दिसत आहे. वृद्ध व्यक्तीने हातात छत्री धरली आहे, तर त्याची वृद्ध पत्नी त्याच्यासोबत चालत आहे. तो अजिबात भिजणार नाही याची पूर्ण काळजी घेतो. रस्ता ओलांडताना दोघेही एकमेकांची काळजी घेतात. ज्या प्रेमाने हे जोडपं पावसात रस्ता ओलांडताना दिसतंय ते लोकांच्या मनाला भिडतंय. त्यामुळेच या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत याला 28 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर मोठ्या संख्येने लोक कमेंट करत आहेत. दोघांच्या प्रेमाचे कौतुक करताना युजर्स एकापेक्षा एक मेसेज लिहित आहेत. हे शेअर करणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे.
अधिक वाचा - Optical Illusion: या फोटोत तुम्हाला हत्ती दिसला का? ९९ टक्के लोक झाले फेल
सोशल मीडियावर अनेक भारावून टाकणारे, मनाला साद घालणारे, आपली संवेदनशीलता वाढवणारे व्हिडिओ किंवा पोस्ट व्हायरल होत असतात. सोशल मीडियाची ताकद आणि व्याप्ती इतकी प्रचंड आहे की काही तासात या पोस्ट किंवा व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचतात आणि व्हायरलदेखील होतात. सध्या जगात जेव्हा सर्वत्र हिंसा, तिरस्कार, द्वेष, माणुसकीचा अभाव दिसत असताना प्रेमाचे मूल्य अधिकच वाढले आहे. अशात जेव्हा आयुष्यभर एकमेकांची साथ देणाऱ्या आणि वृद्धावस्थेतील देखील एकमेकांना सांभाळून घेत एकमेकांवरील प्रेमाची अनुभूती देणाऱ्या या आजी आजोबांचा व्हिडिओ सर्वांच्याच ह्रदयाला स्पर्श करतो आहे.