Lockdown: सततच्या लॉकडाऊनमुळे चिनी लोकांचा उद्रेक; घरात बंद असलेल्या लोकांचा ओरडण्याचा व्हिडिओ व्हायरल 

व्हायरल झालं जी
Updated Apr 12, 2022 | 11:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

China covid 19 update | भारतात सुदैवाने दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये घट होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधातून नागरिकांची सुटका झाली आहे. मात्र जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाते तांडव अद्याप सुरू आहे. दरम्यान जिथून कोरोनाचा जन्म झाला त्या चीनमध्ये वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आला आहे.  

Video of people in China being locked up at home due to lockdown goes viral
सततच्या लॉकडाऊनमुळे चिनी लोकांचा उद्रेक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाते तांडव अद्याप सुरू आहे.
  • चीनमध्ये सध्या 'झिरो कोविड पॉलिसी'चे पालन केले जात आहे.
  • लॉकडाऊनमुळे शांघाय शहरातील २६ कोटी जनता त्यांच्या घरात कैद झाली आहेत. 

Lockdown In China | नवी दिल्ली : भारतात सुदैवाने दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये घट होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधातून नागरिकांची सुटका झाली आहे. मात्र जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाते तांडव अद्याप सुरू आहे. दरम्यान जिथून कोरोनाचा जन्म झाला त्या चीनमध्ये वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने चीनमध्ये सध्या 'झिरो कोविड पॉलिसी'चे पालन केले जात आहे. चीनमधील सर्वात मोठे शहर शांघायमध्ये कोविडचा फैलाव वाढल्यानंतर सरकारने संपूर्ण शहरात कडक लॉकडाऊन लागू केले आहे. (Video of people in China being locked up at home due to lockdown goes viral). 

अधिक वाचा : Mumbai Bank : प्रवीण दरेकर यांचं काय होणार?

दरम्यान, सततच्या कठोर निर्बधांमुळे आणि लॉकडाऊनमुळे चीनमधील जनता त्रस्त असल्याचे व्हिडिओ मधून समोर आले आहे. ज्यात लोक आपल्या अपार्टमेंटमध्ये ओरडताना ऐकू येत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तेथील स्थानिक लोक लॉकडाऊनला कंटाळून आरडाओरडा करताना दिसत आहे. तसेच या कडल लॉकडाऊनचे गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा देखील देत आहेत.

५ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू

कोरोनाचा ज्या चीनमध्ये जन्म झाला त्या कोरोनाने पुन्हा एकदा आपल्या मायदेशात तांडव घातले आहे. आपल्या कोविड धोरणानुसार, चीनने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ५ एप्रिलपासून शांघामध्ये लॉकडाऊन केले आहे. शहरातील २६ कोटी जनता त्यांच्या घरात कैद झाली आहेत. 

सध्या अमेरिकेत राहत असलेले प्रसिध्द आरोग्य शास्त्रज्ञ एरिक फीगल-डिंग यांनी शांघायचे काही व्हिडिओ ट्विट केले आहेत. व्हिडिओ ट्विट करताना त्यांनी कॅप्शनद्वारे म्हटले की, चीनमधील लोकं अपार्टमेंटमधून स्थानिक बोली शांघायमध्ये आरडा- ओरडा करत आहेत. "लॉकडाऊनच्या सातव्या दिवशी शांघायचे रहिवासी त्यांच्या उंच अपार्टमेंटमधून ओरडत आहेत. एक व्यक्ती ओरडून सांगतो की अनेक समस्या येणार आहेत. लोकांना जास्त काळ वेठीस धरून ठेवता येत नाही." असे त्यांनी ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहले. 

अधिक वाचा : नोएडा-गाझियाबाद... तीन दिवसांत तीन शाळा बंद

शांघायनी भाषेतील व्हिडिओ व्हायरल 

डॉ. एरिक यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लोकांचा लवकरच राग बाहेर येणार असल्याचे भाकीत वर्तवले. व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत त्यांनी म्हटले की, "हा व्हिडिओ पूर्णपणे खरा आहे, माझ्या सूत्रांनी याबाबात खात्री केली आहे. शांघायनी ही स्थानिक बोली आहे. तसेच चीनच्या १.३ अब्ज लोकसंख्येपैकी फक्त १४० दशलक्ष चिनी लोक ही भाषा बोलतात. मला ही भाषा अवगत आहे कारण माझा जन्मच तिथे झाला आहे." 

शांघायमध्ये कडक लॉकडाऊनमुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. घरात कैद असलेल्या लोकांसाठी अन्नाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक व्हिडिओ समोर आल्या आहेत, ज्यामध्ये लोक कमी खर्चात जास्त दिवस भाजी साठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी