Baba Ramdev Viral Video | पेट्रोल, डिझेल दरवाढीचा विषय काढला, तर रामदेव बाबा म्हणतात...'असे प्रश्न विचारू नका', पाहा व्हिडिओ

Baba Ramdev on Petrol hike : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने (Petrol-Diesel price hike) सर्वसामान्य चिंताग्रस्त झाला आहे. इंधन दरवाढीचा विषय सध्या सर्वत्रच चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर योगगुरू आणि उद्योजक बाबा रामदेव (Baba Ramdev) यांना पेट्रोल-डिझेल दरवाढीसंदर्भात प्रश्न विचारला असता बाबा रामदेव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरू आहे.

Baba Ramdev Viral Video
बाबा रामदेव यांचा व्हायरल व्हिडिओ 
थोडं पण कामाचं
  • इंधन दरवाढीचा विषय सध्या सर्वत्रच चर्चेत
  • योगगुरू आणि उद्योजक बाबा रामदेव (Baba Ramdev) यांना पेट्रोल-डिझेल दरवाढीसंदर्भात प्रश्न विचारला असता बाबा रामदेव यांनी दिली प्रतिक्रिया
  • प्रश्नांना वैतागलेल्या बाबा रामदेव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Baba Ramdev on Petrol Diesel hike : नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने (Petrol-Diesel price hike) सर्वसामान्य चिंताग्रस्त झाला आहे. इंधन दरवाढीचा विषय सध्या सर्वत्रच चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर योगगुरू आणि उद्योजक बाबा रामदेव (Baba Ramdev) यांना पेट्रोल-डिझेल दरवाढीसंदर्भात प्रश्न विचारला असता बाबा रामदेव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. एका पत्रकाराने पेट्रोलच्या किमतींसंदर्भात विचारले असता बाबा रामदेव म्हमाले की असे प्रश्न विचारू नका. याधी बाबा रामदेव यांनी म्हटले होते की जर काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली तर पेट्रोल आणि एलपीजीच्या किंमती कमी होतील. (Video of Ramdev's reaction on petrol, diesel price hike goes viral)

बाबा रामदेव यांचा व्हिडिओ व्हायरल

पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत प्रश्न विचारले असता बाबा रामदेव काहीसे चिडले. रामदेव म्हणाले "असे प्रश्न विचारू नका. मी काय ठेका घेतला आहे काय की तुम्ही जे काही विचाराल त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावे लागेल? मी ते विधान केले होते आणि आता नाही. तुम्हाला जे करता येईल ते करा.'' यानंतर बाबा रामदेव यांनी दिलेल्या उत्तराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या ताज्या व्हिडिओमध्ये योगगुरू इंधन दरवाढीच्या प्रश्नाने चिडलेले दिसतात. त्यानंतर ते पत्रकाराला धमकावतानादेखील दिसतात आणि पुढे म्हणतात की असे प्रश्न पुन्हा विचारले तर ते आपल्यासाठी चांगले होणार नाही.

एका युजरने बाबा रामदेव यांचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

रामदेव बाबा यांचे जुने प्रतिपादन

बाबा रामदेव यांनी 2014 मध्ये एका मुलाखतीत म्हटले होते की, "माझ्याकडे एक संधोधन आहे ज्यामध्ये पेट्रोलची मूळ किंमत केवळ 35 रुपये आहे मात्र त्यावर 50% कर आकारला जातो." ते पुढे म्हणाले होते की जर कर ५० टक्क्यांवरून १ टक्क्यावर आणले तर इंधनाच्या किंमती कमी होतील. रामदेव म्हणाले होते की त्यांनी या अर्थशास्त्राचा बराच अभ्यास केला आहे.योगगुरू असेही म्हणाले होते की, "अर्थशास्त्रज्ञ हे वॉशिंग्टन कॉन्सेन्सस [विकसनशील देशांसाठी आर्थिक धोरण शिफारशींचा संच], सेन्सेक्स आणि एफडीआयचे गुलाम आहेत."

मागील काही दिवसांत इंधनदरवाढीमुळे सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येते आहे. रोजच दरवाढ होत असल्याने आधीच असलेल्या महागाईमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. मागील 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 6.40 रुपयांनी वाढल्यानं रामदेव यांच्या काही टिप्पण्या आणि प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

पेट्रोल, डिझेलचे आजचे दर

पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 80 पैशांनी वाढले. त्यामुळे 10 दिवसांत एकूण 6.40 रुपयांनी वाढ झाली. आजच्या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलचा दर आता 101.81 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 93.07 रुपये प्रति लिटरने विकला जाईल. मुंबईत पेट्रोल अनुक्रमे 116.72 रुपये प्रति लिटर, चेन्नईमध्ये 107.45 रुपये आणि कोलकाता येथे 111.35 रुपये प्रति लिटर दराने विकले जाते. नुकत्याच झालेल्या वाढीसह, डिझेल मुंबईत अनुक्रमे 100.94 रुपये प्रति लिटर, चेन्नईमध्ये 97.52 रुपये आणि कोलकाता येथे 96.22 रुपये प्रति लिटरने विकले जाते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी