Viral Video : मास्तरांनी असे उच्चारले रंग की भल्याभल्यांची तंद्री झाली भंग! व्हिडिओ पाहून व्हाल दंग..

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका शिक्षकाने रंगांची अशी काही नावं उच्चारली की पाहणाऱ्यांना हसू फुटल्याशिवाय राहणारच नाही.

Viral Video
मास्तरांनी असे उच्चारले रंग, भल्याभल्यांची तंद्री झाली भंग  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • मास्तरांनी उच्चारली रंगांची नावे
  • चुकीची नावे उच्चारल्याने पिकला हशा
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ अपलोड होत असतात. त्यातील काही गंभीर असतात तर काही मनोरंजक असतात. मात्र त्यात काही व्हिडिओ असे असतात जे इतरांचं लक्ष वेधून घेतात आणि पुन्हा पुन्हा पाहिले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आहे स्वतःला शिक्षक म्हणवणाऱ्या एका तरुणाचा. हातात स्वयंपाकाचा मोठा चमचा त्याने छडीप्रमाणे पकडला आहे आणि फळ्यावर जणू शिक्षकांनी लहान मुलांना एकेका शब्दाचा उच्चार शिकवावा, त्या अविर्भावात हा तरुण रंगांची स्पेलिंग वाचतो आहे.

चुकीचे पण मजेशीर उच्चार

इंग्रजी शब्दांचा उच्चार करण्याच्या अनेक पद्धती जगभरात आहेत. ब्रिटीशांचं इंग्रजी योग्य की अमेरिकनांचं योग्य, यावरूनही अनेकदा वाद झडत असतात. मात्र या सर्व वादांना दूर सारत या मास्तरांनी रंगांच्या नावांचा उच्चार करण्याची आपली स्वतःचीच पद्धत अंमलात आणली आहे. हे मास्तर ज्या प्रकारे रंगांच्या नावाचा उल्लेख करतात, ते पाहून भल्याभल्यांना हसू आवरणं अशक्य होतं. अत्यंत गंभीर ढंगात जणू काही फार महत्त्वाचं शिक्षण देत असल्याच्या थाटात हा तरुण दिसतो आणि प्रत्यक्षात जेव्हा त्याच्या तोंडून रंगांचे उच्चार बाहेर पडतात, ते ऐकून प्रत्येकजण खदाखदा हसू लागतो. 

अधिक वाचा - Family Horse : कुटुंबाला वाचवण्यासाठी घोड्याची आगीत झेप, ‘फॅमिली हॉर्स’चा व्हिडिओ पाहून येईल डोळ्यात पाणी

प्रत्येक उच्चार चुकीचा

स्वतःवर केलेला विनोद हा सर्वश्रेष्ठ विनोद मानला जातो. इतर कुणाच्या दुखऱ्या ठिकाणांवर वार करण्याऐवजी स्वतःच बावळटपणाचा मुखवटा धारण करणे, हा विनोदनिर्मितीतील एक दर्जेदार प्रकार मानला जातो. कुणाचाही अपमान न करता आणि इतर कुणालाही न दुखावता विनोद करता येऊ शकतात, हे या व्हिडिओतून दिसून येत आहे. इंग्रजीचे उच्चार हा आपल्याकडे एक फारच प्रतिष्ठेचा मुद्दा मानला जातो. मात्र त्याला फाटा देत शब्दांचं जसं स्पेलिंग आहे, तसेच उच्चार कऱणारा हा तरुण आपल्याला मनसोक्त हसवतो. विशेष म्हणजे त्याने उच्चार केलेला एकही शब्द योग्य नसल्याचं शेवटी समजतं. मात्र तोपर्यंत विनोदनिर्मिती होऊन गेलेली असते आणि आपण पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक झालेले असतो.

अधिक वाचा - या Optical Illusion ने लोकांचं डोकं फिरवलं, तीक्ष्ण नजर असणारेही गोंधळले

व्हिडिओ होतोय व्हायरल

विनोदनिर्मितीचा दावा करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर रतीब घालतच असतात. मात्र असे काही व्हिडिओ कुठलंही मार्केटिंग न करता आपोआप व्हायरल होत असतात. सध्या हा व्हिडिओदेखील असाच व्हायरल होत असून युजर्स त्यावर मनमोकळ्या कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी