Viral:  उपचारासाठी माकडाने पिल्लाला छातीवर घेऊन गाठला दवाखाना; पाहा भावनिक व्हिडीओ

Monkey Viral Video । सोशल मीडियावर एक माकड सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान या माकडाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे, जो पाहून लोक भावूक होत आहेत. कारण, व्हिडिओमध्ये एक माकड जखमी झाले आहे.

video of the monkey going to the doctor for wound treatment is going viral
उपचारासाठी माकडाने पिल्लाला छातीवर घेऊन गाठला दवाखाना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उपचारासाठी माकडाने पिल्लाला छातीवर घेऊन गाठला दवाखाना.
  • बिहारच्या सासाराम येथील एका माकडाचा व्हिडीओ व्हायरल.
  • माकडाचा भावनिक व्हिडीओची सर्वत्र चर्चा.

Monkey Viral Video । मुंबई : सोशल मीडियावर एक माकड सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान या माकडाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे, जो पाहून लोक भावूक होत आहेत. कारण, व्हिडिओमध्ये एक माकड जखमी झाले आहे. दुसऱ्या माकडाने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. व्हिडीओ पाहणारी प्रत्येक व्यक्ती भावनिक होत आहे. लक्षणीय बाब म्हणजे लोक हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहे. (video of the monkey going to the doctor for wound treatment is going viral). 

अधिक वाचा : IND vs SA: आज अशी असू शकते भारत आणि द. आफ्रिकेची प्लेईंग ११

दरम्यान, अनेकदा तुम्ही कळपात माकडे पाहिली असतील. माकडे अनेकदा लोकांना त्रास देतात असा लोकांचा समज आहे. कधी ते वस्तू घेऊन पळून जातात, तर कधी लोकांकडून वस्तू हिसकावून घेतो. त्याचबरोबर अनेक वेळा माकडही माणसांच्या निशाण्यावर येतात. लोक माकडांना एकटे पाहताच त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे माकडे अनेकदा जखमी होतात. बिहारच्या सासाराम येथील एका माकडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला असून त्यात एक माकड जखमी अवस्थेत पाहायला मिळत आहे. त्या माकडावर कोणीतरी हल्ला केल्याचे दिसत आहे ज्यामध्ये ते माकड जखमी झाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे माकड आपल्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी दवाखान्यात पोहचले आहे. 

उपचार घेण्यासाठी माकडाची थेट दवाखान्यात धाव

माकड डॉक्टरांकडून कसे उपचार घेत आहे हे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. माकड टेबलावर आरामात बसले आहे, तर डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. त्याच्यावर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी असेही सांगितले की, सुरुवातीला मी देखील घाबरलो होतो, परंतु माकडाने वेदनादायक आवाज काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी त्याच्यावर उपचार केले आणि त्याला क्लिनिकमध्ये थोडा वेळ आराम करून दिला. हा भावनिक व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. या घटनेवर अनेक जण विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी