Volcano eruption: ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अतिभयंकर VIDEO, पाहा एका दगडाचं काय झालं..

निसर्गाचं विराट रुप दाखवणारा ज्वालामुखीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसात जर एखादा दगड फेकला, तर काय होऊ शकतं, याची कल्पना हा व्हिडिओ पाहून येते.

Volcano eruption
ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अतिभयंकर VIDEO  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • ज्वालामुखीच्या रौद्र रुपाची येते कल्पना
  • दगडानेही घेतला पेट
  • निसर्गाचं विराट रुप होतंय व्हायरल

Volcano eruption: निसर्गाची (Nature) सुंदर रुपं अनेकांनी पाहिलेली असतात. मात्र निसर्ग कधीकधी त्याचं भयंकर रुपही (Dangerous side) दाखवतो. कधी हे भयंकर रुप समुद्रात उठणाऱ्या भल्यामोठ्या त्सुनामीच्या (Tsunami) रुपात दिसतं, कधी जंगलांना लागणाऱ्या महाकाय वणव्यांमध्ये दिसतं, तर कधी सोसाट्याच्या प्रलयंकारी वादळाच्या रुपात दिसतं. निसर्ग अनेकदा आपलं रौद्र रुप दाखवत असतो आणि त्याच्या तडाख्यात येणारा कुणीही त्यापासून बचावणं कठीण असतं. निसर्गाचं असंच एक रौद्ररुप म्हणजे ज्वालामुखी. ज्वालामुखीविषयी (Volcano) अनेकांनी पाहिलेलं आणि वाचलेलं असतं. मात्र प्रत्यक्ष ज्वालामुखी कसा असतो आणि ज्वाला रस काय करु शकतो, हे दाखवून देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. 

ज्वालामुखीची भीषणता

ज्वालामुखी जेव्हा जिवंत होतो, तेव्हा त्यातून लाव्हारस बाहेर पडायला सुरुवात होते. या लाव्हारसाचं तापमान साधारण 1100 ते 1200 अंश सेल्सिअस एवढं असतं. पाणी जेव्हा उकळतं तेव्हा त्याचं तापमान केवळ 100 अंश असतं. उकळलेलं पाणी अंगावर पडलं तर काय होतं याची कल्पना आपण करू शकतो. या पाण्याच्या अकरा ते बारा पट अधिक तापमान लाव्हारसाचं असतं. या लाव्हारसात जेव्हा कुठलीही गोष्ट पडते तेव्हा त्या गोष्टीचं काय होऊ शकतं, याची कल्पना यावरून आपण करू शकतो. 

दगडाने घेतला पेट

जर लाव्हारसात माणूस पडला तर काही क्षणांत त्याचा दगड होऊ शकतो, असं म्हटलं जातं. एखादा दगड जर प्रत्यक्ष लाव्हारसात पडला तर काय होईल, हे सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. ‌निसर्गाचं सगळ्यात रौद्र रुप केवळ काही फूट अंतरावरून या व्हिडिओत पाहता येतं. एकाने काही फूट उंचीवर एक दगड खाली फेकल्याचं या व्हिडिओत दिसतं. तो दगड गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार वेगाने खाली जातो. खालून लाव्हारस वाहत असल्याचं दिसतं. काही सेकंदांतच दगड खाली पडतो आणि तिथे एक ज्योत दिसू लागते. हळूहळू त्याचा भडका उडतो आणि दगडाने पेट घेतल्याचं दिसतं. लाव्हारसाचं तापमान किती उच्च असतं, याची जाणीव या व्हिडिओतून होते. एक दगड पेट घेतल्याचं सहसा कधी आपण पाहत नाही. मात्र लाव्हारसाचं तापमानच एवढं असतं की तिथे दगडदेखील पेट घेतात. 

अधिक वाचा - Viral Video: नवरदेवाने स्टेजवर केलं असं काही की संतापली नववधू अन् मग धू-धू धुतला

व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून 20 लाखांपेक्षाही अधिक लोकांनी तो पाहिला आहे. 9000 पेक्षा अधिक लोकांनी तो रिट्विट केला आहे. निद्रिस्त ज्वालामुखीला दगड मारून जागे करणं, असं कॅप्शन त्याखाली देण्यात आलं आहे. या व्हिडिओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत असून निसर्गाचा हा रुद्रावतार पाहून आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया अनेकजण व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी