Fight over Seat : मेट्रोमधील सीटवरून बायकांची भांडणं, Video होतोय Viral

रेल्वे प्रवासात होणारी भांडणं ही नित्याचीच बाब. मेट्रो रेल्वेतील भांडणांचा असाच एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Fight over Seat
मेट्रोमधील सीटवरून बायकांची भांडणं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मेट्रोमध्ये बायकांची भांडणं
  • बसण्याच्या जागेवरून वाद
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Fight over Seat : सोशल मीडियावर (Social Media) दररोज लाखो व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. आजकाल बहुतांश नागरिकांकडे स्मार्ट फोन आले असून इंटरनेटही स्वस्तात उपलब्ध आहे. परिणामी कुठल्याही घटनेचं चित्रिकरण सहज करणं शक्य होत आहे. सोशल मीडियावर अपलोड होणारे काही व्हिडिओ हे मजेशीर असतात, तर काही व्हिडिओ अत्यंत गंभीर असतात. अनेकदा गंभीर वाटणारे व्हिडिओदेखील जाणीवपूर्वक नाटकीय पद्धतीने नियोजन करून रेकॉर्ड करण्यात आलेले असतात. त्यातील नाटकीपणा पाहताक्षणी आपल्याला जाणवतो. मात्र काही व्हिडिओ हे सत्य घटनेचे असतात आणि त्या क्षणी कुणीतरी कॅमेरा सुरू केल्यामुळे घटना कॅमेऱ्यात कैद झालेली असते. असे व्हिडिओ अधिकाधिक लोकप्रिय होतात आणि व्हायरलही होतात. याच पठडीतील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

मेट्रोमधील भांडणाचा व्हिडिओ (Fight in Metro)

या व्हिडिओत काही महिला मेट्रोतून प्रवास करताना दिसतात. त्यापैकी दोन बायकांनी आपल्या मध्ये एक बॅग ठेवल्याचं दिसतं. ती बॅग तिथून हटवली तर एक व्यक्ती बसू शकेल, एवढी जागा होऊ शकते, हे कुणालाही समजतं. मात्र तिथं बसण्याची विनंती करणाऱ्या एका तरुणीला मात्र त्या बायका तिथे जागा नसल्याचं सांगतात. त्यावर ती भडकते आणि एका महिलेच्या शेजारी जाऊन अपुऱ्या जागेत खेटून बसते. त्यानंतर मात्र जोरदार वादावादी सुरू होते. या महिलांच्या समोर बसलेल्या कुणीतरी त्याचवेळी रेकॉर्डिंग सुरू करून हे भांडण कॅमेऱ्यात कैद केल्याचं दिसतं. 

अधिक वाचा - Viral Video : बसल्या बसल्या जात होता जमिनीखाली, थोडक्यात बचावला जीव, पाहा व्हिडिओ

जोरदार वादावादी

या महिला एकमेकांशी जोरदार भांडताना दिसतात. मध्ये एवढी जागा असून तुम्ही का सरकून घेत नाही, असा सवाल तरुणी महिलेला विचारते. तर तू काय आता आमच्या मांडीवर बसणार का, असा प्रतिप्रश्न ती महिला करते. त्यानंतर दोघींमध्ये जोरदार खडाजंगी सुरू होते. दोघीही एकाच वेळी ओरडू लागतात आणि त्यांच्यातील बरेचसे संवाद ऐकूही येत नाही. मात्र हे भांडण जोरदार पेटतं आणि आजूबाजूच्या सर्वांचं लक्ष या भांडणाकडे जातं. काही वेळ हे भांडण सुरू राहतं आणि अखेरपर्यंत दोघींपैकी कुणीच माघार घेत नाही. मेट्रोत बसण्याच्या जागेवरून झालेलं हे किरकोळ भांडण सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. 

अधिक वाचा - Viral Video: भयंकर... 6300 फूट उंचीवर झोका घेणाऱ्या मुली थेट गेल्या डोंगराखाली!

व्हिडिओ होतोय व्हायरल

हे महिला स्पेशल भांडण असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेक युजर्सनी दिली आहे. जागा असतानाही जागा नाही असं एखाद्या पुरुषाने सांगितलं असतं, तर तो या क्षणी जिवंतच राहिला नसता, अशी प्रतिक्रियाही एका युजरने दिली आहे. तर असं भांडण केवळ महिलाच करू शकतात, असा टोमणाही एकाने मारला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी