तहानलेल्या कुत्र्याला जेव्हा वृद्धानं हातानं पाजलं पाणी, व्हायरल व्हिडिओ सर्वांना भावला

व्हायरल झालं जी
Updated Feb 28, 2020 | 13:32 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Viral Video: एका वृद्ध व्यक्तीनं एका तहानलेल्या कुत्र्याला आपल्या हातांनी पाणी पाजलं. लोकांच्या मनाला भावलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होतोय. पाहा हा व्हिडिओ...

old man helping thirsty dog
पाहा तहानलेल्या कुत्र्यासोबत काय केलं ‘या’ वृद्धानं  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • एका वृद्धाचा कुत्र्याला हातानं पाणी पाजतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • ट्विटरवर हा व्हिडिओ भारतीय फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर सुशांत नंदा शेअर केलाय.
  • प्रत्येकाला मानवतेची शिकवण देणाऱ्या व्हिडिओची सोशल मीडियावर होतेय स्तुती

नवी दिल्ली: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ झपाट्यानं व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती एका तहानलेल्या कुत्र्याला आपल्या हातांनी पाणी पाजतांना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. लोकांच्या मनाला वृद्धाची कृती खूप भावली आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केलाय भारतीय फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर सुशांत नंदा यांनी...

या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की, एका नळाजवळ एक कुत्रा उभा आहे आणि वृद्ध व्यक्ती त्याला आपल्या हातांनी पाणी आणून-आणून पाजतोय. हा व्हिडिओ पाहून आज सुद्धा मुका जनावरांवर प्रेम करणारे लोक आहेत, हे दिसून येतंय. अनेक लोक मुक्या जनावरांची काळजी आपल्या मुलांप्रमाणे घेतात. त्यांचं सर्व करतात, त्यांना सांभाळतात.

या व्हिडिओच्या माध्यमातून सुशांत नंदा यांनी मानवतेची एक नवीन शिकवण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘जर आपण कुठल्याही असहाय्य व्यक्तींसाठी किंवा मुक्या जनावरांसाठी काही करू शकत नसाल तर आपलं आयुष्य व्यर्थ आहे.’

 

 

सोशल मीडियावर प्रत्येक जण हा व्हिडिओ शेअर करतोय. व्हिडिओला भरभरून प्रेम मिळतंय. लोकांचं म्हणणं आहे की, आज लोकांजवळ पैसा आणि पावर आहे. मात्र खूप कमी लोकांजवळ अशी माणुसकी आणि हृदय आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी