mask rakhi: बहिणीने घातली मास्कवाली राखी, भावाने केले असे काही की...

व्हायरल झालं जी
Updated Aug 03, 2020 | 16:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

rakhi mask video viral: कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरू असतानाच एका बहिणीने आपल्या भावाला मास्कवाली राखी बांधली. भावाने बहिणीच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर गिफ्ट केले. 

mask rakhi
बहिणीने घातली मास्कवाली राखी, भावाने केले असे काही की... 

थोडं पण कामाचं

  • कोरोनाकाळात रक्षाबंधनाचा सण साजरा
  • भावाने बहिणीच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर गिफ्ट केले. 
  • देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढता वाढे

मुंबई: कोरोना व्हायरसचा(corona virus) सध्या देशभर प्रकोप सुरू आहे. या प्रकोपादरम्यानच रक्षाबंधनाचा सण(rakshabandhan festival) साजरा केला जात आहे. यंदा लोक घरीच बसून रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहे. मात्र कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला संबोधित करताना लोकांना अपील केले की गरज असेल तरच घराबाहेर पडा. जेव्हा कधी घरातून बाहेर पडाल तेव्हा मास्क लावा. जर मास्क लावू शकत नसाल तर नाक, तोंड झाकले जाईल याची काळजी घ्या. अशातच सोशल मीडियावर राखीच्या दिवसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या व्हिडिओ एक बहीण आपल्या भावाला राखी बांध आहे. राखी बांधण्याआधी ती आपल्या भावाला ओवाळते. त्यानंतर  टिळा लावते आणि त्याच्या हातात नारळ देते. पाणी शिंपडून भावाभोवती ओवाळले. नंतर मिठाई भरवली. मिठाई भरवल्यानंतर ही बहीण भावाच्या हातात राखी बांधण्याच्या ऐवजी त्याच्या तोंडावर मास्कवाली राखी बांधते. ज्यामुळे तिच्या भावाचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण होईल. याचवेळेसही हा भाऊही आपल्या बहिणीच्या सुरक्षेसाठी तिला गिफ्ट म्हणून सॅनिटायझर गिफ्ट देतो. तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता...

देशात कोरोनाबाधितांचा दिवसेंदिवस वाढतच आहे. देशात एका दिवसांत तब्बल ५२ हजार ९७२ प्रकरणे समोर आल्यानंतर सोमवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ लाखाहून अधिक झाले. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ११.८६ लाखाहून अधिक झाली आहे. आयसीएमआरच्या मते भारतात आतापर्यंत कोरोनाच्या दोन कोटीहून अधिक टेस्ट झाल्या आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सकाळी आठ वाजेपर्यंतच्या अपडेट डेटानुसार देशात कोरोना व्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या १८, ०३,६९५ इतकी झाली आहे. तर एकाच दिवसात तब्बल ७७१ लोकांचा जीव गेला. यासोबतच कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३८,१३५ इतकी झाली आहे. तसेच कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्याही वाढून ११,८६,२०३ इतकी झाली आहे तर देशात ५,९७,३५७ लोक कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डेटानुसार कोरोनातून बर होण्याचा दर ६५.४४ टक्के इतका असून कोरोनामुळे मृत्यूचा दर कमी होत २.११ टक्के इतका आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी