Viral News : बचपन नव्हे तर पचपन का प्यार, १८ वर्षीय तरुणी पडली ५५ वर्षाच्या व्यक्तीच्या प्रेमात, बॉबी देओलच्या गाण्यामुळे झाली जादू

तुम्ही बचपन का प्यार हे व्हायरल गाणे ऐकले असेल. पण पाकिस्तानमध्ये पचपन का प्यार समोर आले आहे. एक १८ वर्षाची तरुणी ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. इतकेच नाही तर बॉबी देओलच्या गाण्यामुळे ही जादू झाली आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नही केले आहे.

pakistani couple
बॉबी देओलच्या गाण्यामुळे तरुणी पडलीवृद्ध व्यक्तीच्या प्रेमात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तुम्ही बचपन का प्यार हे व्हायरल गाणे ऐकले असेल. पण पाकिस्तानमध्ये पचपन का प्यार समोर आले आहे.
  • एक १८ वर्षाची तरुणी ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे.
  • इतकेच नाही तर बॉबी देओलच्या गाण्यामुळे ही जादू झाली आहे.

Viral News : इस्लामाबाद : तुम्ही बचपन का प्यार हे व्हायरल गाणे ऐकले असेल. पण पाकिस्तानमध्ये पचपन का प्यार समोर आले आहे. एक १८ वर्षाची तरुणी ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. इतकेच नाही तर बॉबी देओलच्या गाण्यामुळे ही जादू झाली आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नही केले आहे. पाकिस्तानमध्ये सध्या या लग्नाचीच चर्चा आहे.  (viral news 18 year old girl fall in love with 55 year old person because of bobby deol song in pakistan read in marathi)

प्रेमाला वयाचे बंधन नसते असे म्हटले जाते. या वाक्याची प्रचिती पाकिस्तानमध्ये पहायला मिळाली आहे. एक १८ वर्षीय तरुणी एका ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. इतकेच नाही तर दोघांनी लग्न केले आहे. बॉबी देओलच्या एका गाण्यामुळे दोघे जवळ आले असे दोघांनी सांगितले आहे. पाकिस्तानमध्ये सईद बसत अली हा एक  युट्युबर आहे. आपल्या चॅनेलसाठी त्याने मुस्कान आणि फारूक अहमद यांची मुलाखत घेतले. मुस्कान १८ वर्षांची असून फारूक अहमद ५५ वर्षांचा आहे. दोघे शेजारी शेजारी राहत होते. 

मुस्कान आपल्या घरात गाणी गुणगुणायची, तेव्हा फारुकच्या कानावर मुस्कानचा आवाज पडायचा. फारुकला मुस्कानचा आवाज आवडयला लागला. तेव्हा फारूक आवर्जून मुस्कानच्या घरी जायचा. त्यानंतर मुस्कानला फारूक आवडयला लागला. त्यानंतर मुस्कान बादल चित्रपटातील बॉबी देओल आणि राणी मुखर्जीचे ना मिलो हमसे ज्यादा कही प्यार हो ना जाए हे गाणे गायला लागली आणि फारुकला इशारे देत राहिली. जेव्हा जेव्हा फारुक मुस्कान घरी जायचा तेव्हा मुस्कान हेच गाणे गायची. त्यानंतर खुद्द मुस्कानने फारुककडे आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि फारुकनेही आपले प्रेम असल्याचे मुस्कानला सांगितले.


त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु मुस्कानचे कुटुंबीय आणि शेजारी पाजारी राहणार्‍या लोकांनी या लग्नाला विरोध केला. कारण दोघांच्या वयामध्ये खूप अंतर होते. असे असले तरी दोघांनी कुटुंबाकडे आणि समाजाकडे दुर्लक्ष केले आणि लग्नबंधनात अडकले. 


नोकराच्या प्रेमात पडली मालकीण

पाकिस्तानमध्ये अशीच एक अनोखी प्रेम कहाणी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यात नाझिया आणि सुफियान एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. नाझिया ही घरमालकीण होती तर सुफियान तिच्याकडे नोकर म्हणून काम करत होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्नही केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी