महिलेची Delivery नंतर नवजात बाळाची उंची, वजन पाहून डॉक्टरही झाले थक्क..!

27 वर्षीय एमे स्मिट ही बकिंघमशायर (यूके) येथील रहिवासी आहे. तिनं 25 मार्च रोजी मुलासाठी सी-सेक्शन सर्जरीची बुकिंग केली होती.

New Born Baby
नवजात बाळाला पाहून डॉक्टरही थक्क 
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक महिला बाळाला जन्म दिल्यानंतर त्या बाळाला पहिल्यांदा पाहण्यासाठी खूप उत्सूक असते.
  • त्या बाळाची उंची आणि वजन दोन्ही सामान्य बाळांपेक्षा जास्त होते.
  • या मुलाच्या ऑपरेशन दरम्यान, डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले.

नवी दिल्ली: असं म्हणतात एखादी स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा त्या महिलेचा पूर्नजन्म होतो. प्रत्येक महिला बाळाला जन्म दिल्यानंतर त्या बाळाला पहिल्यांदा पाहण्यासाठी खूप उत्सूक असते. पण अशी एक घटना घडली आहे की जेव्हा आईनं आपल्या नवजात बाळाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिला धक्काच बसला आहे. कारण त्या बाळाची उंची आणि वजन दोन्ही सामान्य बाळांपेक्षा जास्त होते. त्या नवजात बाळाची लांबी 2 फुटांपेक्षा जास्त आणि वजन 5.6 किलोपेक्षा जास्त होती. या महिलेला आधीच एक मुलगी आहे. त्याच वेळी, या मुलाच्या ऑपरेशन दरम्यान, डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले. कारण मुलाला बाहेर काढण्यासाठी दोन लोकांची मदत घ्यावी लागली. आता या बाळाचं वय दोन महिन्यांहून जास्त झालं आहे. 

27 वर्षीय एमे स्मिट ही बकिंघमशायर   (यूके) येथील रहिवासी आहे. तिनं 25 मार्च रोजी मुलासाठी सी-सेक्शन सर्जरीची बुकिंग केली होती. पण एमे आणि तिचा जोडीदार जॅक यांनी कधीही विचार केला नाही की, त्यांच्या मुलाचे वजन साडेपाच किलोग्रॅमपेक्षा जास्त असेल. तसं पाहिलं तर हे जोडपे 6 फुटांपेक्षा जास्त उंच आहे.

बाळ उंचीनं मोठा होईल अशी कल्पना आधीच होती असं एमेनं म्हटलं. पुढे ती सांगते की, आम्ही केलेल्या प्रत्येक सोनोग्राफीमध्ये बाळ खूप उंच दिसत होतं. पण तो इतका मोठा असेल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती.

जेव्हा मुलाचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांना ही हादरा बसला, असं एमेनं सांगितलं. सर्जरीच्या वेळी दोन लोकांची गरज पडली, ज्यांनी बाळाला बाहेर काढलं. मला अनेक महिलांनी घेरलं होतं. त्यातील एक महिला अचानक ओरडली, मला मदत हवी आहे हे खूप मोठं आहे, असं एमेनं सांगितलं. 

अधिक वाचा- United Nations: लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम दक्षिण सुदानमध्ये शांती सेनेचे कमांडर

पुढे एमे म्हणते, जेव्हा बाळाला वजनासाठी नेण्यात आलं तेव्हा तो वजन काट्यावर पूर्णपणे मावत नव्हता, त्यानंतर वजन काट्यावर एक लाकडी फळी बसवली गेली, त्यानंतर त्याचे वजन केलं गेलं. 

कपडे झाले लहान 

एमे आणि तिच्या पार्टनर त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी 3 महिन्यांच्या बाळाचे मोजमाप करून कपडे खरेदी केले होते. पण हे कपडेही त्याला बसत नव्हते. यानंतर त्यांनी आपल्या मुलासाठी 6 ते 9 महिन्यांच्या बाळाच्या आकाराचे कपडे मागवले.

अधिक वाचा-  LPG Cylinder Price Hike: महागाईचा फटका, LPG सिलेंडर 50 रुपयांनी महागला; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर

या नवजात बाळाचे नाव जॅगरीज ठेवण्यात आलं आहे, तर त्याचे टोपणनाव जॅक आहे. त्याचवेळी, या जोडप्याला एक मुलगी देखील आहे, तिचे नाव लोला आहे. लोलाचा जन्म सप्टेंबर 2018 मध्ये झाला होता. तेव्हा त्याचे वजन 4 किलोपेक्षा जास्त होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी