Viral News : काय म्हणता? गूगलमुळे देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री!

Viral  : अज्ञात कारणामुळे गूगल या सर्च इंजिनवर देवेंद्र फडणवीस हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याचे दिसत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

viral news devendra fadnavis deputy chief minister of uttar pradesh
Viral News : काय म्हणता? गूगलमुळे देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री!  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Viral News : काय म्हणता? गूगलमुळे देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री!
  • प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस हे ३० जून २०२२ पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
  • फडणवीस ३१ ऑक्टोबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

Viral  : अज्ञात कारणामुळे गूगल या सर्च इंजिनवर देवेंद्र फडणवीस हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याचे दिसत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण 'टाइम्स नाउ मराठी'ने सर्च केले त्यावेळी गूगलवर devendra fadnavis deputy chief minister असे की वर्ड टाकून बघितल्यावर Devendra Fadnavis Deputy Chief Minister of Maharashtra असे दिसले. devendra fadnavis deputy chief minister of uttar pradesh असे की वर्ड टाकून बघितल्यावर देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री अशा स्वरुपाच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील निवडक वेबसाईटच्या बातम्या आढळून आल्या. 

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही आठवड्यांपासून अनपेक्षित अशा घटना घडत आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना आधी शिवसेनेचे दोन तृतियांशपेक्षा जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षावर नाराज असल्याचे वृत्त आले. शिवसेनेचे तसेच इतर पक्षांचे आणि अपक्ष असे मिळून ५० आमदार एकजुटीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाविरोधात नाराजी व्यक्त करू लागले. काही दिवसांतच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि आमदार या दोन्ही पदांचा राजीनामा दिला. यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. आधी मंत्रीपद स्वीकारणार नसल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले होते. पण भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या आग्रही सूचनेमुळे फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. सरकार स्थापन झाले तरी राज्याचे मंत्रिमंडळ अद्याप तयार झालेले नाही. एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला तरी राज्याचा कारभार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वात प्रशासकीय यंत्रणा करत आहे. मंत्रिमंडळ कधी स्थापन होणार यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. या अशा वातावरणात गूगल या सर्च इंजिनवर देवेंद्र फडणवीस हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याचे दिसत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस हे ३० जून २०२२ पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.  

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस हे ३० जून २०२२ पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. याआधी काही काळ त्यांनी राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. ते ३१ ऑक्टोबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नंतर विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना या निवडणूकपूर्व युतीला बहुमत मिळाले. पण शिवसेनेने विचार बदलला. यानंतर २३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे सरकार अल्पकाळ टिकले. फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले. अडीच वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या उलथापालथी मात्र अद्याप सुरू आहेत. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, फडणवीस कोणत्या खात्याची जबाबदारी हाताळणार अशी चर्चा सुरू असताना अचानक फडणवीस महाराष्ट्राऐवजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी