आयएएस होण्याचा नाद सोडत या तरुणांनी सुरू केले चहाचे दुकान, आज १०० कोटींची उलाढाल

पालकांना वाटत होते की त्यांच्या मुलांनी आयएएस अधिकारी (IAS) व्हावे, मात्र मुलांनी चहाचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या चहाच्या व्यवसायाची उलाढाल इतकी झाली आहे की ते पाहून कोणतेही पालक व्यवसायाला पाठिंबा देतील.

Tea seller become crorepati
चहा विक्रेते बनले कोट्यधीश  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • इंदूरमधील दोन तरुणांच्या यशाची कहाणी
  • आएएएसची तयारी सोडून सुरू केले चहाचे दुकान
  • आज १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल

इंदूर: कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. त्यातच ते काम करण्यात मजा येत असेल तर यश नक्की मिळते. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) तरुणांची कहाणीदेखील हेच सांगते. पालकांना वाटत होते की त्यांच्या मुलांनी आयएएस अधिकारी (IAS) व्हावे, मात्र मुलांनी चहाचा व्यवसाय सुरू केला. आश्चर्य हे आहे की आज त्यांच्या चहाच्या व्यवसायाची उलाढाल इतकी झाली आहे की ते पाहून कोणतेही पालक आपल्या मुलांना चहाचा व्यवसाय (Tea seller) करण्यापासून रोखणार नाही. ही कहाणी (Success story)आहे अनुभव दुबे (Anubhav Dubey)आणि आनंद नायक (Anand Nayak) या तरुणांची, चाय सुट्टा बारची (Chai Sutta Bar). ही कहाणी आहे शून्यातून कोट्यवधींच्या उलाढालीची. (Viral News: IAS Aspirant become tea seller, today 'Chai Sutta Bar' at Indore, have turn over of Rs 100 crore)

तरुणांना डोळ्यासमोर ठेवता सुरू केला व्यवसाय

अनुभव दुबे पुढील शिक्षणासाठी इंदूर (Indore)येथे आला असताना त्याची भेट आनंद नायकशी झाली. दोघेही शिकत होते. मात्र त्यानंतर आनंदने शिक्षण सोडून व्यवसाय सुरू केला, तर अनुभव आयएएस होण्याचे स्वप्न बाळगत युपूएससीच्या तयारीसाठी (IAS Aspirant) दिल्लीला निघून गेला. दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले होते. मात्र अशातच एक दिवस अनुभवला आनंदचा फोन आला. आनंदने अनुभवला सांगितले की माझा व्यवसाय चांगला चालत नाही, आपण दोघे मिळून काहीतरी केले पाहिजे. अनुभवच्या मनातदेखील व्यवसाय करण्याची इच्छा होतीच, त्यामुळे त्याने आनंदला होकार दिला. त्यांनी तरुणांना डोळ्यासमोर ठेवत चहाचे दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. दोघांचेही म्हणणे आहे की देशात पाण्यानंतर सर्वाधिक चहाच पिण्यात येतो आणि त्याला कायमच मागणी आहे. शिवाय चहाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी फारशा पैशांचीदेखील गरज नसते. त्यामुळेच त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

३ लाखांनी सुरू झाले 'चाय सुट्टा बार'

अनुभव आणि आनंद या दोघांनी २०१६ मध्ये ३ लाख रुपयांच्या भांडवलानिशी चहाचा व्यवसाय सुरू केला. इंदूरमध्ये त्यांनी आपले चहाचे दुकान थाटले. यासाठी शक्कल लढवत त्यांनी गर्ल्स होस्टेलच्या शेजारीच एक खोली भाड्याने घेतली आणि सेंकड हॅंड फर्निचरचा वापर करत दुकान थाटले. पैसे नसल्यामुळे दुकानाचा बोर्ड किंवा नामफलकदेखील साधाच बनवून घेतला. त्यांनी आपल्या दुकानाला नाव दिले, 'चाय सुट्टा बार'. व्यवसाय करणे सोपे नव्हते. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. कुटुंबाबरोबरच नातेवाईकांचे टोमणेदेखील ऐकावे लागले. अनुभव आयएएस होण्याची तयारी सोडून चहाच्या व्यवसायात उतरला होता, ही गोष्ट अनेकांसाठी धक्कादायक होती.

देश-परदेशात नावलौकिक आणि १०० कोटींची उलाढाल

अडचणी येत असतानाही आनंद आणि अनुभव यांनी धीर न सोडता आपले प्रयत्न सुरू ठेवले. हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. ग्राहकांची संख्या वाढू लागली आणि त्यांचे उत्पन्नदेखील वाढू लागले. त्यांनी इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर करून आपल्या दुकानाचे प्रमोशन केले. त्याचा त्यांना खूप फायदा झाला. आज 'चाय सुट्टा बार'ची उलाढाल १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. देशभरात त्यांचे १६५ पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत. १५ राज्यांमध्ये ही आउटलेट्स आहेत. 'चाय सुट्टा बार'मध्ये १० रुपयांच्या चहापासून १५० रुपयांपर्यत चहाचे वेगवेगळे प्रकार मिळतात.

अनुभव आणि आनंदची ही कहाणी अनेकांना प्रेरणा आणि बळ देणारी आहे. धीर न सोडता अथक प्रयत्नाने यश कसे मिळवता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. आयएएस होऊन जितकी कमाई करता आली नसती त्यापेक्षा अधिक कमाई आज चहाच्या व्यवसायातून अनुभव करतो आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी