नरभक्षक माणसाच्या घरात सापडली हजारो मानवी हाडे, पसरली दहशत आणि भीती

Viral News : मेक्सिको पोलिसांनी आता त्या अपार्टमेंटमधील आणखी काही खोल्यांमध्ये खोदकाम करण्याची तयारी चालवली आहे. आरोपी व्यक्तीच्या घरात अनेक वर्षांपूर्वी गायब झालेल्या लोकांचे आयडी कार्ड, कपडे आणि सामान सापडले

Mexico Police arrest Man eater Killer
मेक्सिकोत नरभक्षक खुन्याला अटक 

थोडं पण कामाचं

  • मेक्सिकोमध्ये थरकाप उडवणारा प्रकार उघड
  • नरभक्षक खुन्याच्या घरात सापडली हजारो मानवी हाडे
  • पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीचा खून केल्यावर सापडला खुनी

मेक्सिको सिटी : उत्तर अमेरिका खंडातील मेक्सिको (Mexico)या देशात एका नरभक्षक माणसाला (Man Eater) पोलिसांनी अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर मेक्सिकोतील त्या परिसरात दहशत पसरली आहे. आरोपी व्यक्तीच्या (Serial Killer) घरात मोठ्या संख्येने मानवी हाडे सापडल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. मेक्सिको पोलिसांनी आरोपीच्या घरात खोदकाम करून ३,७८७ मानवी हाडे (Human Bones) ताब्यात घेतली आहे. या थरकाप उडवणाऱ्या प्रकरणाने अनेकांना दिल्लीत नोएडा येथे काही वर्षापूर्वी झालेल्या निठारी हत्याकांडाची (Nithari Murder case)आठवण झाली. (Mexico : Thousands of bones recovered from a man eater, serial killer's house)

सराईत नरभक्षक आहे आरोपी

द सन मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार नरभक्षक खून्याचे नाव अॅन्ड्रेस असे आहे. तो व्यवसायाने कसाई आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो अतिशय वेगाने, काही क्षणांतच लोकांची शिकार करायचा. या सिरियल किलर नरभक्षक खून्याच्या घरी पोचलेल्या फॉरेन्सिक टीमला आतापर्यत २० पेक्षा जास्त लोकांचे अवशेष किंवा हाडांचे सापळे सापडले आहेत. याशिवाय पोलिसांना हजारो मानवी हाडे सापडल्याची माहिती समोर आली आहे. या नरभक्षक खुन्याच्या म्हणजे अॅन्ड्रेसच्या घरातील फरशीखालील कॉंक्रीटमधून ही मानवी हाडे आणि सापळे पोलिसांच्या हाती आली आहेत. फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तपासादरम्यान असे आढळले की या सर्व मृतदेहांचे अत्यंत छोट्या छोट्या तुकडे करण्यात आले आहेत.

असा सापडला नरभक्षक खूनी

पोलिस आता पुढील तपासासाठी खुन्याच्या अपार्टमेंटमधील आणखी इतर खोल्यांमध्येदेखील खोदकाम करणार आहेत. या खुन्याच्या घरातून अनेक वर्षांपूर्वी गायब झालेल्या लोकांचे आयडी कार्ड, कपडे आणि इतर वस्तू सापडल्या. यातून हे स्पष्ट झाले आहे की या खुनी मागील अनेक वर्षांपासून माणसे मारत होता. या खुन्याने त्याच्या परिचयातीलच एका पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीचा खून केला होता. समोर आलेल्या माहितीनुसार या पोलिस अधिकाऱ्याची पत्नी सिरियल किलर अॅंड्रेसला ओळखत होती, त्यांचा चांगला परिचय होता. पोलिस अधिकाऱ्याची पत्नी सिरियल किलर अॅंड्रेससोबत शॉपिंगसाठी बाजारात गेली होती आणि त्यानंतर ती गायब झाली. त्या दिवसापासून तिची कोणतीही माहिती मिळत नव्हती. जेव्हा पत्नी घरी परतली नाही तेव्हा या पोलिस अधिकाऱ्याला अॅंड्रेसचा संशय आला.

सिरियल किलरचा बचावाचा प्रयत्न

स्थानिक पोलिसांनी जेव्हा या नरभक्षक खुन्याला अटक केली आणि संबंधित पुराव्यांसह न्यायालयात त्याला हजर केले. विविध घटनाक्रमांचीही माहिती यावेळेस पोलिसांनी न्यायालयाला दिली. आरोपीने एका सुंदर तरुणीचाही खून केला होता. विशेष म्हणजे ती तरुणी आरोपीला आवडायची. नरभक्षक खुन्यासंदर्भात न्यायालयात चार तास सुनावणी चालली. यादरम्यान पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या खुनाच्या आरोपात जेव्हा या सिरियल किलरला कोर्टात सादर करण्यात आले तेव्हा त्याने आपण आजारी असल्याचे नाटकदेखील केले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी