ऑन ड्युटी इन्स्पेक्टरच्या खांद्यावर बसला माकड आणि काढू लागला ऊवा, पाहा [video]

व्हायरल झालं जी
Updated Oct 09, 2019 | 18:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील पोलीस स्टेशनात जे दृश्य पाहायला मिळाले, ते पाहून सध्या सोशल मीडियावरील लोक हैराण आहे. पोलिस स्टेशनात पोलिस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर माकड चढला आणि ऊवा काढू लागला.  

viral news monkey sat on the seat of inspector pilibhit in uttar pradesh news in marathi google news
ऑन ड्युटी इन्स्पेक्टरच्या खांद्यावर बसला माकड आणि काढू लागला ऊवा, पाहा [video] 

लखनऊ :  पोलीस ठाण्यात लोक आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी येतात. साधारणपणे खादी वर्दीतील व्यक्तींला लोक घाबरतात. रस्त्यावर आपल्या शक्तीचे प्रदर्शन करणारे पोलिसांचे नाव काढल्यावर त्यांची तंतरते. पण एका मुक्या जनावराला हे का माहिती की हा पोलिसांचा मोठा अधिकारी आहे की साधा हवालदार... उत्तर प्रदेशातील पीलीभीत येथे एका पोलीस ठाण्यात आपल्या फाईलचा निपटारा करणाऱ्या इन्पेक्टरच्या खांद्यावर अचानक एक माकड आले आणि त्यांच्या डोक्यात काही तरी शोधू लागले. अशी हिम्मत एखादा व्यक्ती करू शकत नाही. 

पोलीस अधिकारी श्रीकांत द्विवेदी यांच्या खांद्यावर एक माकड बसले. यावेळी तो त्यांच्या खाकी वर्दी किंवा कायद्याशी कोणतीही छेडछाड करत नव्हता तर तो पोलिस अधिकाऱ्याच्या केसातून ऊवा काढत होता. खूप तल्लीन होऊन माकड आपले काम करत होता. त्याला याचे भान नव्हते की आपण जे करत आहोत, तो एक पोलीस अधिकारी आहे. माकडाच्या हा कृत्याचा पोलीस अधिकाऱ्यालाही काही त्रास होत नव्हता, त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी याला हरकत घेतली नाही. त्यामुळे हा प्रकार अॅडश्नल एसपी राहुल श्रीवास्तव आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. 

एडीश्नल एसी पदावर तैनात असलेले राहुल श्रीवास्तव यांनी इंटरेस्टिंग अंदाजात हा व्हिडिओ ट्विट केले. पीलीभीत येथील इन्स्पेक्टर साहेबांचा अनुभव सांगताना म्हटले की तुम्हांला कामात व्यत्यय नको पाहिजे असले तर तुमच्या केसांमध्ये रिठा, शिकेकाई किंवा चांगल्या शॅम्पूचा वापर करा. 

सोशल मीडियावर कमेंटचाप पाऊस 

काही जण म्हटले की इन्स्पेक्टर साहेबांनी इतक्या वेळ बजरंगबलीला झेलले, त्यामुळे ते जनतेच्या समस्या गंभीरतेने घेत असतील. 
सकारात्मक पक्ष पण पाहा सर! डोक्यावर अडचण असताना कामात किती तल्लीन आहेत हे सर, नाही तर आज काल नेता, बाबांचे मसाजचे व्हिडिओ जास्त व्हायरल होत आहेत. 
माझा वैयक्तीक अनुभव आहे. की श्रीकांत नावाचे हे पोलिस अधिकारी द्विवेदी असो किंवा राय, खूपच चांगली, कर्मठ, इमानदार आणि संवेदशील असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...