व्हर्जिनिया: Lottery Number: प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काहींना काही स्वप्न घेऊन जगत असतो. ती स्वप्न करण्यासाठीही व्यक्ती प्रयत्न करतो. मात्र याव्यतिरिक्त प्रत्येक व्यक्ती झोपेत स्वप्न बघतो. त्यातली काही स्वप्नं खरी ठरतात तर काही स्वप्नं खोटी... काही स्वप्नं चांगली असतात तर काही वाईट स्वप्नंही पडतात. जर एखाद्या वेळेस चांगलं स्वप्नं पडलं तर लगेच मनात विचार येतो की, जर हे स्वप्नं पूर्ण झालं तर... पण असं एका व्यक्तीच्या बाबतीत झालं आहे. आज आम्ही असंच एक रात्री झोपेत पडलेल्या स्वप्न पडलेल्या गोष्टीबद्दल सांगणार आहोत. या व्यक्तीला असं स्वप्नं पडलं की त्याच आयुष्यचं पूर्णपणे बदलून गेलं. एका रात्री या व्यक्तीनं स्वप्नात लॉटरीचा नंबर पाहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तोच नंबर लॉटरीसाठी लावला. त्यानंतर ते स्वप्न सत्यात उतरताना दिसलं.
अलोंजो कोलमॅन असं या व्यक्तीचं नाव आहे. अलोंजो यांच्या स्वप्नात लॉटरीचा नंबर दिसला. लॉटरीचा नंबर दिसल्यानंतर त्यांनी सकाळीच उठून आधी लॉटरीची तिकीट खरेदी केली. काही वेळातच त्यांना समजलं की, लॉटरी लागली आहे. ही लॉटरी जिंकल्यावर अलोंजो यांना जवळपास 2 कोटी रूपये मिळाले आहेत. अलोंजो कोलमॅननं कधीच विचार केला नसेल की त्यांना कधी 2 कोटी रूपयांची लॉटरी लागेल.
अधिक वाचा- Beautiful कियारा अडवाणीचे ब्यूटी आणि फिटनेस सीक्रेट
लॉटरी लागल्याची बातमी समोर येताच अलोंजो कोलमॅन भलतेच ट्रेंडिगमध्ये आले आहेत. ही घटना अमेरिकेतल्या व्हर्जिनियामधली आहे.
दोन डॉलरमध्ये बनले 2 कोटींचे मालक
कोलमॅन यांनी सांगितलं की, लॉटरीचं हे तिकीट 2 डॉलरमध्ये खरेदी केलं होतं. पण कधी असं काही होईल वाटलं नव्हतं. जेव्हा लॉटरी अधिकाऱ्यानं मला सांगितलं की मला लॉटरी लागली आहे आणि मी 1.97 कोटी रूपये जिंतलो आहे. तर मला त्यावर विश्वासच बसला नाही. कोलमॅन पुढे सांगतात, मी एक रिटायर्ड अधिकारी आहे. टीव्ही बघत असताना लॉटरीबद्दल माहिती मिळाली तेव्हा लॉटरीद्वारे आपलं नशीब उजळवण्याचा विचार केला.
40 लाख लोकांना हरवून झाले कोट्यधीश
एका रिपोर्टनुसार, सुमारे 40 लाख लोकांनी या लॉटरीचे तिकीट खरेदी केलं होतं. अशा परिस्थितीत 40 लाख लोकांना पराभूत करून अलोंजो कोलमॅन हे विजेते ठरले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हर्जिनियाची लॉटरी कंपनी 'व्हर्जिनिया लॉटरी' बुधवार आणि रविवारी सोडत काढते. तीन विजेत्यांना बक्षिसे दिली जातात. प्रथम बक्षिसाची रक्कम 10 लाख डॉलर आहे. त्याच वेळी, द्वितीय बक्षीस म्हणून 5 लाख डॉलर्स आणि तृतीय बक्षीस म्हणून 2.5 लाख डॉलर्सचे बक्षीस देण्यात येते.