व्हेल माशाने केली उलटी, मासेमारांचे उघडले नशीब, हाती लागला करोडोंचा खजिना

येमेनमधील मासेमारांना रातोरात कोट्यधीश बनवणारी (Yemen Fishermen becomes millionaire overnight) घटना घडली आहे आणि तीदेखील व्हेल माशाने उलटी केल्याने (Vomit of Whale).

Viral story of Fishermen of Yemen
व्हेल माशाच्या उलटीने केले मासेमारांना कोट्यधीश 

थोडं पण कामाचं

  • व्हेल माशाच्या उलटीने कोट्यधीश झाले मासेमार
  • येमेनमधील धक्कादायक घटना, रात्रीतून बदलले मासेमारांचे नशीब
  • मासेमारांनी व्हेलच्या उलटीला युएईच्या व्यापाऱ्याला कोट्यवधीत विकले

नवी दिल्ली : कोणाचे नशीब कधी बदलेल याबद्दल नक्की काहीच सांगता येत नाही. एखाद्या व्यक्तीचे भाग्य कधी चमकेल हे कोणालाच माहित नसते. आखातातील सौदी अरेबियाजवळचा (Gulf country near Saudi Arabia)छोटासा देश असलेल्या येमेनमध्ये (Yemen) अशीच एक थक्क करणारी, दंतकथा वाटावी अशी घटना घडली आहे. येमेनमधील मासेमारांना रातोरात कोट्यधीश बनवणारी (Yemen Fishermen becomes millionaire overnight) घटना घडली आहे आणि तीदेखील व्हेल माशाने उलटी केल्याने (Vomit of Whale). तसे तर उलटी हा शब्द ऐकला की सर्वांनाच किळस येते. मात्र व्हेल माशाच्या उलटीने एखाद्या व्यक्तीच्या हाती खजिना लागू शकतो याची कोणीही कधीही कल्पना केली नसेल. येमेनच्या या मासेमारांच्या नशीबाची (Fortune of Fishermen) चर्चा सर्वत्र होते आहे. (Viral news : Vomit of Whale makes Fishermen millionaires overnight in Yemen)

मासे पकडण्यासाठी गेले होते मासेमार


या थक्क करणाऱ्या घटनेच्या हाती आलेल्या माहितीनुसार येमेनमधील हे मासेमार रोजच्या प्रमाणेच आपल्या उदरनिर्वाहासाठी मासे पकडण्यासाठी समुद्रात निघाले होते. याच दरम्यान येमेनच्या खाडीत एडनजवळ त्यांचे लक्ष अशा एका गोष्टीवर गेले ज्याची कधी कोणी कल्पनादेखील केले नसेल. मासेमारांना समुद्रात एक मेलेला व्हेल मासा तरंगताना दिसला. त्या मासेमारांनी लगेचच त्या व्हेल माशाला पकडून किनाऱ्यावर आणले. यानंतर सर्वांच्याच लक्षात आले की व्हेल माशातून फार दुर्गंधी येते आहे. त्यानंतर त्यांनी व्हेल माशाला फाटलेले पाहिले आणि त्यानंतर ते आनंदाने उड्या मारायला लागले.

माशाच्या पोटात कोट्यवधींचा खजिना


व्हेल मासा हा पृथ्वीवरील सर्वात मोठा मासा तर असतोच परंतु तो सर्वात मोठा सस्तन प्राणीदेखील असतो. व्हेल माशाच्या पोटात जी उलटी असते त्याची किंमत कोट्यवधींमध्ये असते. व्हेल माशाच्या उलटीला अॅंबरग्रीस (Ambergris)असे म्हणतात. मासेमारांच्या जेव्हा हे लक्षात आले तेव्हा ते नाचायला लागले. व्हेल माशाच्या पोटातून १२७ किलो उलटी त्या मासेमारांच्या हाती लागली. त्याची किंमत तब्बल १० कोटीपेक्षा अधिक सांगण्यात येते आहे. एका मासेमाराने बीबीसीला सांगितले की ही एक अकल्पनीय किंमत होती, आम्ही सर्व गरीब आहोत. आम्ही कधी विचारदेखील केला नव्हता की ही वस्तू आम्हाला इतकी मोठी रक्कम मिळवून देईल. 

आपसात वाटून घेतला पैसा आणि दानदेखील केले


व्हेल माशाची उलटी म्हणजे अॅंबरग्रीसला 'समुद्राचा खजिना' किंवा 'फ्लोटिंग गोल्ड' देखील म्हटले जाते. ही सर्वाधिक मागणी असणाऱ्या वस्तूंपैकी एक आहे. कारण याचा वापर परफ्युममध्ये केला जातो. परफ्युमचा सुगंध दीर्घकाळ राहावा यासाठी त्यात व्हेल माशाच्या उलटीचा वापर केला जातो. अॅंम्बरग्रीस सर्वसाधारणपणे ५०,००० डॉलर प्रति किलोग्रॅम या भावाने विकला जातो. येमेनच्या मासेमारांनी व्हेल माशाची उलटी युएईच्या म्हणजे संयुक्त अरब अमिरातीच्या एका व्यापाऱ्याला जवळपास १.३ अब्ज येमेनी रियालमध्ये विकले. म्हणजेच जवळपास १५ लाख अमेरिकन डॉलर (१०.९६ कोटी रुपये) इतकी त्याची किंमत आहे. मासेमारांनी त्या कमाईला आपसात समानरित्या वाटून घेतली. याशिवाय त्यातील काही पैसे त्यांनी आपल्या समाजातील गरीब कुटुंबांमध्ये दान केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी