विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी महिलेने पतीच्या गुप्तांगावर लावले नट बोल्ट, मोठ्या प्रयत्नांनी वाचला जीव

विवाह झालेला असतानादेखील त्या पुरुषाचे दुसऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते. ही गोष्ट त्याच्या पत्नीला कळल्यावर तिने या गोष्टीचा जबरदस्त बदला घेतला. महिलेची ही बदला घेण्याची विचित्र कथा सोशल मीडियावर व्हायरल.

Extra Marital Affair
महिलेने पतीवर घेतला बदला 

थोडं पण कामाचं

  • पतीच्या विश्वासघातामुळे त्रस्त महिला
  • रागाच्या भरात महिलेने रात्री पतीच्या खासगी अवयवाला लावले नट बोल्ट
  • परिस्थिती गंभीर झाल्यावर पतीला दाखल केले हॉस्पिटलमध्ये

नवी दिल्ली: प्रेमात विश्वासघात झाल्यावर किंवा नात्यामध्ये विश्वासघात झाल्यावर कोणतीही व्यक्ती राग व्यक्त करते. काहीवेळेला तर टोकाचे पाऊलदेखील उचलेले जाते. त्यातही हे नाते जर पती आणि पत्नीमधील असेल तर त्यात प्रचंड तणाव असतो. याविषयीची अनेक उदाहरणे, किस्से किंवा घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. मात्र विश्वासघातासंदर्भातील एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पुरुषाने आपल्या पत्नीशी विश्वासघात केला. तिच्या प्रेमाचा अनादर केला म्हणूण त्याच्या पत्नीने त्याला जी शिक्षा दिली त्याची तुम्ही कधी कल्पनादेखील केली नसेल. विवाह झालेला असतानादेखील त्या पुरुषाचे दुसऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते. ही गोष्ट त्याच्या पत्नीला कळल्यावर तिने या गोष्टीचा जबरदस्त बदला घेतला. या महिलेची ही बदला घेण्याची विचित्र कथा सोशल मीडियावर (Viral on Social Media) प्रचंड व्हायरल होते आहे.  (Viral News: Wife tights nut bolt on husbands private parts in suspicion of extra marital affair)

युक्रेनमधील दांपत्याची विचित्र कथा

ही घटना युक्रेनमधील आहे. तेथील एका जोडप्याच्या आयुष्यातील ही घटना आहे. लग्न झालेले असतानादेखील पतीचे दुसऱ्या एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. ही गोष्ट त्या पुरुषाच्या पत्नीला कळली. त्यानंतर त्याची पत्नी प्रचंड संतापली. तिने या गोष्टीचा बदला घेण्याचे आणि आपल्या पतीला अद्दल घडवण्याचे ठरवले. त्या महिलेने रात्री आपला पतीन झोपल्यानंतर त्याच्या खासगी भागावर म्हणजे लिंगावर लोखंडी नट बोल्ड टाईट केले. त्यानंतर तिच्या पतीची परिस्थितीत अतिशय गंभीर झाली. अखेर त्या महिलेच्या पतीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर सर्जरी केली. त्या पुरुषाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती, जर वेळेत ही सर्जरी झाली नसती तर त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. आपल्या पतीचे बाहेर अनैतिक संबंध आहेत असा संशय त्या महिलेला आल्यानंतर ती अस्वस्थ झाली होती. अनेक दिवस अस्वस्थ मनस्थितीत घालवल्यावर तिने हे टोकाचे पाऊल उचलेले होते.

महिलेचा बदला सोशल मीडियावर झाला व्हायरल

त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार आपल्या पतीने केलेल्या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी म्हणून आपण हे सर्व केले. द सनने दिलेल्या वृत्तानुसार महिलेने जेव्हा पतीच्या गुप्तांगावर नट बोल्ट टाईट केले तेव्हा तो गाढ झोपलेला होता. महिला पतीच्या गुप्तांगावर नट बोल्ट टाईट करून झोपली. मध्यरात्री जेव्हा त्या माणसाला जाग आली तेव्हा तो वेदनेने ओरडू लागला. त्याने नट काढण्याचा प्रयत्न केला मात्र अनेकवेळा प्रयत्न केल्यानंतरदेखील यश येत नव्हते आणि वेदना वाढतच चालली होती तेव्हा अखेर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्याच्या सर्जरी केली आणि तो नट बाहेर काढला. या महिलेची ही कथा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी