'लग्नानंतरच्या पहिल्या रात्री मला पिरियड्स होते, मात्र नवरा सैतान झाला होता', महिलेने शेअर केला अनुभव

लग्न झाल्यानंतर पतीने पत्नीशी लैंगिक बाबतीत कोणत्याही पद्धतीने वर्तणूक केली तरी त्यात वावगे समजले जात नाही. मात्र आता इजिप्तमधील महिलांनी आपल्या वाट्याला आलेल्या वाईट लैंगिक अनुभव शेअर केले आहेत.

Sexual abuse after marriage in Egypt
लैंगिक अत्याचाराविरोधात इजिप्तमधील महिलांचा आक्रोश 

थोडं पण कामाचं

  • पतीने केली पहिल्याच रात्री जबरदस्ती
  • इजिप्तमधील अनेक भागांमध्ये जबरदस्ती आणि हिंसक सेक्स प्रचलित
  • २७ वर्षाच्या सनाचा मोठा संघर्ष

नवी दिल्ली: लैंगिक शोषणाच्या संदर्भात जगभरातील महिलांनी आता आवाज उठवण्यात सुरूवात केली आहे. मुळातच लैंगिक विषयांशी  निगडीत समस्यांबद्दल कमी बोलले जाते. त्यात महिलांच्या लैंगिक शोषणच्या (Sexual Abuse of Women) किंवा अत्याचाराबद्दल तर फारच कमी आवाज उठवला जातो. लग्नानंतरचे लैंगिक शोषण म्हणजेच वैवाहिक बलात्कार (Sexual abuse after marriage)हा तर फारच दुर्लक्षिलेला मुद्दा आहे. लग्न झाल्यानंतर पतीने पत्नीशी लैंगिक बाबतीत कोणत्याही पद्धतीने वर्तणूक केली तरी ते दोघे विवाहीत असल्यामुळे यात अजिबात वावगे समजले जात नाही. मात्र अलीकडे या मुद्द्यावरदेखील चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. इजिप्तमधील (Egypt) एका टीव्ही शो वर दाखवण्यात आला त्यामध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित एक सीन होता. यानंतर तर महिलांनी आपल्याबरोबर झालेल्या विविध प्रसंगांबद्दल, आपल्या वाट्याला आलेल्या वाईट लैंगिक अनुभवांबद्दल सोशल मीडियावर (Women broke out on Social media regarding sexual harrasement) जोरदार मांडणी केली. (Women in Egypt are breaking the silence regarding the sexual abuse in after marriage)

पतीने केली पहिल्याच रात्री जबरदस्ती (Sexual abuse aftr marriage)

एका ३४ वर्षाच्या महिलेने लग्नानंतरच्या आपल्या पहिल्याच रात्रीचा अनुभव सांगताना पोस्ट लिहिली आणि म्हटले की 'त्या रात्री मला मासिक पाळी आलेली होती. साहजिकच मी सेक्ससाठी तयार नव्हते. मात्र माझ्या पतीला वाटले की मी मुद्दामच त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवू इच्छित नाही. त्यामुळे त्याने मला मारहाण केली, माझे हात बांधले आणि माझे तोंड बंद करून माझ्यावर बलात्कार केला. हे सर्व घटत असताना माझी कंबर, माझी मनगटे आणि माझ्या चेहऱ्यावर जखमा झाल्या.' अर्थात त्या महिलेने सामाजिक बदनामीच्या भीतीने आपल्या पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली नाही. इजिप्तमध्येही महिलांवर पतीद्वारे करण्यात येणाऱ्या अत्याचारांची संख्या मोठी आहे. 

२७ वर्षाच्या सनाचा मोठा संघर्ष

२७ वर्षांची सना आपल्याबरोबर झालेल्या अत्याचाराची आठवण काढत म्हटते की, तो एक देवमाणूस होता. आमच्या लग्नानंतर एका वर्षानंतर मी गर्भवती झाले. माझे प्रसूतीचे दिवस जवळ आले. एक दिवस एका छोट्याशा मुद्द्यावर आम्हा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्याने मला शिक्षा देण्याचे ठरवले. त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आणि माझ्यावर बलात्कार केला. त्यामुळे माझा गर्भपात झाला. सना आपल्या घटस्फोटासाठी एकट्यानेच लढली आणि संघर्ष केला. आता ती आपल्या पतीपासून वेगळी झाली आहे. मात्र आपल्या त्या गर्भपाताचे आणि त्या गमावलेल्या अपत्याचे दु:ख तिला आजही आहे. हा अनुभव तिने पोस्ट केला आहे.

प्रसिद्ध गायिकेचा व्हिडिओ झाला व्हायरल (Viral Video)

इजिप्तमधील अनेक भागांमध्ये जबरदस्ती आणि हिंसक सेक्स प्रचलित आहे. विशेषत: लग्नानंतरच्या पहिल्या रात्री इजिप्तमधील अनेक भागांमधील पुरूष आपल्या पत्नीशी हिंसक पद्धतीने सेक्स करतात. या मुद्दयावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेने आणखी मोठे स्वरुप तेव्हा घेतले जेव्हा एका प्रसिद्ध गायिकेने आपल्या इंस्टाग्रामवर आपल्या वैवाहिक बलात्काराच्या घटनेबद्दल लिहिले. रडतानाचा त्या गायिकेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याची खूपच जास्त चर्चा झाली. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देण्यात आल्या. त्या गायिकेच्या पतीने इन्टाग्रामवरील पोस्टमध्ये त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना चुकीचे ठरवत आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी