Viral Photo: या फोटोत काय दिसत आहे ते सांगू शकाल, IFS अधिकाऱ्याचा नागरिकांना सवाल

Viral Photo Do you know what is seen in the picture IFS officer asked questions to people : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. सध्या एका आयएफएस अधिकाऱ्याने (वन अधिकारी) विचारलेला प्रश्न पण व्हायरल होत आहे.

Viral Photo Do you know what is seen in the picture
Viral Photo: या फोटोत काय दिसत आहे ते सांगू शकाल 
थोडं पण कामाचं
  • Viral Photo: या फोटोत काय दिसत आहे ते सांगू शकाल
  • IFS अधिकाऱ्याचा नागरिकांना सवाल
  • अनेकांनी दिलं उत्तर

Viral Photo Do you know what is seen in the picture IFS officer asked questions to people : देशातील बहुसंख्य नागरिकांच्या हाती स्मार्टफोन आला आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून असंख्य नागरिक दररोज सोशल मीडियावर मुशाफिरी करत असतात. यामुळे सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. अचानक नागरिकांची एखाद्या विषयात उत्सुकता वाढते अथवा एखादी बाब त्यांना आवडते आणि ती व्हायरल होते. आता एका आयएफएस अधिकाऱ्याने (वन अधिकारी) विचारलेला प्रश्न पण व्हायरल होत आहे. । व्हायरल झालं जी

सुरेंद्र मेहरा या आयएफएस अधिकाऱ्याने (वन अधिकारी) एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोबाबत मेहरा यांनी एक प्रश्न विचारला आहे. फोटोत दिसणारी गोष्ट काय आहे, असा प्रश्न मेहरा यांनी विचारला आहे. या प्रश्नाला अनेकांनी त्यांच्या अंदाजाप्रमाणे उत्तरं देण्यास सुरुवात केली आहे. मेहरा यांचे ट्वीट व्हायरल होत आहे.

मेहरा यांनी ट्वीट केलेला फोटो हा एक क्लोजअप फोटो आहे. दर्जेदार कॅमेऱ्याद्वारे हा फोटो काढण्यात आला आहे. हा फोटो ट्वीट करून मेहरा यांनी कोणी याला ओळखू शकता का, अशा स्वरुपाचा प्रश्न उपस्थित केला आहे.

फोटो बघून अनेकांनी अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी फोटो एखाद्या माशाचा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे तर काहींनी फोटो ऑक्टोपसचा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पण उत्तर सांगण्यासाठी मेहरा यांनी मूळ फोटो ट्वीट केला त्यावेळी अनेकांना विश्वास बसला नाही.

मेहरा यांनी जेव्हा उत्तर सांगण्यासाठी मूळ फोटो ट्वीट केला त्यावेळी अनेकांना पहिला क्लोजअप हा एका मगरीचा असल्याचे लक्षात आले. आयएफएस सुरेंद्र मेहरा यांनी एका मगरीच्या जबड्याचा क्लोजअप आधी ट्वीट केला आणि नंतर उत्तर सांगण्यासाठी मगरीचा तोंड उघडलेल्या स्थितीतील फोटो ट्वीट केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी