Sister & brother meets after 75 years : नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानची फाळणी (India-Pakistan Partition) ही अतिशय दु:खद आणि लाखो लोकांचे आयुष्य बदलून टाकणारी घटना होती. या फाळणीमुळे अनेक कुटुंबांना मोठ्या दु:खाचा आणि संकटांचा सामना करावा लागला. त्यांचे सर्व आयुष्यच उद्वस्त झाले. अशीच एक कहाणी फाळणीनंतर आता एकमेकांच्या संपर्कात आलेल्या भावंडांची आहे. बहीण पाकिस्तानात तर भाऊ भारतात आहे. एका पाकिस्तानी युट्युबरमुळे (Pakistani YouTuber) या बहीण आणि भावाचे एकमेकांशी बोलणे होणार आहे. राखी पौर्णिमेच्या (Raksha Bandhan) दिवशी हे बहीण-भाऊ एकमेकांशी बोलणार आहेत. एका युट्युबरच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होणार असून ही कहाणी प्रचंड व्हायरल (Viral Story) झाली आहे. या ह्रदयदावक कहाणीमुळे वाचणारे आणि पाहणारे सर्वच भावनाविविश होत आहेत. (Viral Story of Sakina Bibi & Gurmail Singh who separated in India-Pakistan Partition)
लाखो लोकांना फाळणीच्या प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. लोकांना घरे सोडून स्थलांतर करावे लागले. बरेच लोक निघून गेले. यात अनेक कुटुंबांची वाताहत झाली. कुटुंबातील सदस्य, भावंडे एकमेकांपासून दुरावली. अशीच एक ह्रदयद्रावक कहाणी व्हायरल झाली आहे. आता राखी पौर्णिमेच्या दिवशी फाळणीच्या दुरावलेले बहीण भाऊ आता वृद्धावस्थेत एकमेकांना भेटणार आहेत.
ही कथा दोन वयोवृद्ध झालेल्या भावंडांची आहे. खरे तर रक्षाबंधनाच्या आगोदर ही कथा समोर आली हा योगायोग आहे. पाकिस्तानातील 67 वर्षीय सकीना बीबी आणि तिचा भाऊ, ज्याला आता गुरमेल सिंग म्हणून ओळखले जाते, त्यांच्यात संवाद घडवून आणण्यात यश आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे की, पाकिस्तानी यूट्यूबर नासिर ढिल्लनने एका मोहिमेअंतर्गत हा शोध पूर्ण केला असून आता त्यांना दोघे सापडले आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी हे बहीण-भाऊ एकमेकांशी व्हिडिओवरून बोलतील, असंही सांगण्यात आलं.
रिपोर्टनुसार, गुरमेल सिंग लुधियानाच्या जसोवाल गावात राहतात, तर त्याची बहीण पाकिस्तानातील सकीना शेखूपुरा येथे राहते. सकीनाची कहाणी ऐकल्यानंतर यूट्यूबने ही कथा अपलोड केली आणि जसोवाल येथे राहणाऱ्या गुरमेल सिंगपर्यंत पोचली. फाळणीपूर्वी गुरमेल यांचा जन्म लुधियानाच्या नूरपूर गावात झाला होता. तर सकीना यांचा जन्म १९५५ मध्ये शेखुपुरा येथील गुरदास गावात झाला होता. पण 1947 च्या फाळणीच्या गोंधळात गुरमेल आपल्या आईसोबत आजीच्या घरी गेले.
अधिक वाचा : Party in the train : ट्रेनमध्ये बिकीनी गर्लसोबत पार्टी, दारुसह तरुणांचा नंगानाच, VIDEO झालाय Viral
त्याचवेळी अधिकारी गुरमेलच्या आईला तिच्या घरी पाठवत होते, मात्र वाटेत गुरमेल कुठेतरी हरवला होता. सकीना म्हणते की तिच्या आईला तिच्या मुलापासून वेगळे होणे सहन होत नव्हते आणि सकीना दोन वर्षांची असताना तिचा मृत्यू झाला. ती तिसरीत असताना तिचे वडील वली मुहम्मद यांचेही निधन झाले. आपला भाऊ मागे राहिला आहे हे सकीनाला माहीत होते.
तेव्हापासून सकीना सतत पत्र लिहित होती. वृत्तानुसार, 1961 मध्ये एकदा पत्राचे उत्तर देखील मिळाले होते, परंतु त्यानंतर कधीही संभाषण झाले नाही. YouTuber नासिर ढिल्लन यांनी अपलोड केलेल्या सकीनाच्या कथेला जसोवाल गावच्या सरपंचाकडून उत्तर मिळाले. त्यांनी सांगितले की, सकीना सध्या रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आहे. आणि लवकरच आपण तिच्या भावाशी एक-दोन दिवसात बोलू. आता या दोन्ही भाऊ-बहीणाला कळले की त्यांचे संभाषण लवकरच होणार आहे.