Viral Video : साडी नेसून जिममध्ये व्यायाम करणारी 56 वर्षांची महिला

viral video 56 year old woman doing gym wearing a saree : भारतात एक 56 वर्षांची महिला साडी नेसून जिममध्ये व्यायाम करते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

viral video 56 year old woman doing gym wearing a saree
Viral Video : साडी नेसून जिममध्ये व्यायाम करणारी 56 वर्षांची महिला  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • Viral Video : साडी नेसून जिममध्ये व्यायाम करणारी 56 वर्षांची महिला
  • इन्स्टाग्रामवर अपलोड झाला व्हिडीओ
  • व्हिडीओत साडी नेसलेल्या महिलेसोबत तिची नात पण जिममध्ये व्यायाम करताना दिसते

viral video 56 year old woman doing gym wearing a saree : फिटनेस जपण्यासाठी, वजन घटविण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांकरिता नियमित जिममध्ये अनेकजण व्यायाम करतात. यात काहीच विशेष नाही. पण 56 वर्षांची महिला साडी नेसून जिममध्ये व्यायाम करत असेल तर ही विशेष बाब म्हणता येईल. ही अनोखी घटना भारतातली आहे. 

भारतात एक 56 वर्षांची महिला साडी नेसून जिममध्ये व्यायाम करते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत असलेली महिला तिच्या नातीसोबत नियमित जिममध्ये जाऊन व्यायाम करते. 

व्हिडीओतली विशेष बाब म्हणजे 56 वर्षांची महिला साडी नेसून जिममध्ये व्यायाम करताना दिसते. हा व्हायरल व्हिडीओ बघून अनेकजण चक्रावले आहेत. साडी नेसलेली महिला जिममध्ये आरामात व्यायाम करते. ही महिला जिममधील उपकरणांना सरावली असल्यामुळे सहजतेने व्यायाम करताना दिसते. 

साडी नेसून जिममध्ये व्यायाम करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ humansofmadrasoff  या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हायरल होत आहे. व्हिडीओत साडी नेसलेली महिला आणि तिची नात या दोघीजणी एकमेकींच्या सहकार्याने व्यवस्थित व्यायाम करताना दिसतात. दोघीजणी नियमित जिममध्ये व्यायाम करत असाव्यात असेच व्हिडीओ बघून जाणवते. 

साडी नेसून व्यायाम करणाऱ्या महिलेने तिच्या मुलाच्या सांगण्यावरून जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. आता संबंधित महिलेला आणि तिच्या नातीला जिमची सवय अंगवळणी पडली आहे. 

व्हायरल होत असलेला साडी नेसून जिममध्ये व्यायाम करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ बघून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील अनेक प्रतिक्रिया या उत्साहवर्धक आहेत. 

चीनमध्ये मेंढ्या रहस्यमरित्या गोल गोल फिरतात

वयाच्या 86 व्या वर्षी बॉडी बिल्डिंग

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी